आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये जनांदोलन उभे करण्यासाठी एकत्रित बैठक संपन्न

सोलापूर: ( रमेश सुरवसे ) महाराष्ट्र शासन दडपशाहीने लादत असलेल्या अनुसूचित जातीच्या 13% आरक्षणाचे अ.ब.क.ड.मध्ये उपवर्गीकरण करून महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या कांही जात समूहामध्ये राज्याच्या फडणवीस सरकारने जातीय तेढ निर्माण केल्याने सामाजिक सलोख्याला तडा जात आहे.त्यामुळे आरक्षणातील अबकड उपवर्गीकरणाला अनुसूचित जातीच्या अन्य जात समूह घटकांनी तीव्र विरोध केला असुन यासाठी महाराष्ट्र राज्यात आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला तीव्र विरोध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनआंदोलने होत आहेत.याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या जात घटक समूहांमधील कांही जबाबदार नेते व पदाधिकाऱ्यांची बैठक रविवार दि.21/06/2026 रोजी दुपारी 12-00 वाजता कामगार शक्ती युनियन, कार्यालय, प्राथमिक शिक्षण मंडळ, नवी पेठ सोलापूर.येथील कार्यालयामध्ये संपन्न झाली.या बैठकीला भविष्यात अनुसूचित जातीमधील जात समूह घटकांच्या संविधानात तरतुदी केलेल्या हक्काच्या आरक्षणातील अबकड उपवर्गीकरणाला तीव्र विरोध करण्यासाठी म्हणून सार्वजनिक जनआंदोलन उभे करण्यासाठी पुढील दिशा ठरवण्याकरिता येत्या रविवारी दि.28/06/26 सार्वजनिक बैठक घेण्याचे उपस्थिता मधील सर्वानुमते ठरले आहे.या बैठकीमध्ये अनुसूचित जातीच्या जात समूह आणि त्यांच्या सामाजिक संघटना तसेच पक्षनिहाय पदाधिकारी आणि ज्येष्ठ अनुभवी खालील प्रमुख मान्यवर नेते उपस्थित होते. यामध्ये रिपब्लिकन चळवळीतील अनुभवी व जुने ज्येष्ठ पॅन्थर नेते जनार्दन शिंदे, आंबेडकरी चळवळीतील जुने अनुभवी नेते तसेच जिल्हा परिषदचे माजी सदस्य पँथर नेते आर.के.कांबळे, साप्ताहिक रिपब्लिकन एक्सप्रेसचे मुख्य संपादक व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ व अनुभवी, नेते पॅंथर श्याम शिरसागर, चर्मकार समाजाचे युवा नेते विठ्ठल व्हनमारे, रविकांत राजनीकर, मातंग समाजाचे हुशार व अभ्यासू आक्रमक लढवय्ये ज्येष्ठ नेते युवराज पवार व मातंग समाज कृती समितीचे शहर अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ् ॲड.शैलेश पोटफोडे, रमेश बोराडे, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस, तसेच आरक्षण हक्क कृती समितीचे जिल्हा समन्वयक,आंबेडकरी चळवळीतील जुने ज्येष्ठ नेते व आक्रमक लढाऊ पॅंथर राजाभाऊ सोनकांबळे, आरक्षण हक्क कृती समितीचे जिल्हा समन्वयक कमलाकर बनसोडे सर, रविदास परिषदेचे अध्यक्ष बाबुराव इंगळे सर, अनुसूचित जाती जनजाती रेल्वे कर्मचारी युनियनचे अध्यक्ष टी.ए.लोहार, आंबेडकर चळवळीतील मोची समाजाचे धुरंदर नेते कुमार चन्ना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष माणिक आठवले, अखिल भारतीय शाख्य संघाचे अध्यक्ष अशोककुमार दिलपाक, वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस अनिरुद्ध वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर शहराचे सरचिटणीस विनोद इंगळे, भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष तडफदार ज्येष्ठ पॅन्थर नेते मिलिंद प्रक्षाळे, भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र राज्याचे सचिव संजय रणदिवे, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मनीष सुरवसे, कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अरुण (भाऊ) क्षीरसागर , बहुजन विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तसेच बहुजन समाज पार्टीचे आक्रमक, अभ्यासु आणि कडवट नेते प्रवीण कांबळे, काँग्रेस आयचे सोलापूर शहर सरचिटणीस गौतम मसलखांब, बौद्ध उपासक विजयानंद भालशंकर, भारतीय बौद्ध महासभेचे युवा अध्यक्ष अमित रा.गायकवाड, चर्मकार महासंघाचे बापू मधुकर चाबुकस्वार, किरण लहू खरात, जनार्दन मोरे, आणि युवा नेते विश्वास गायकवाड, नागेश इंगळे, हरिदास वाघमारे, रमेश बोराडे यांच्यासह अनुसूचित प्रवर्गात मोडणाऱ्या जात घटक समूहातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाभाऊ सोनकांबळे यांनी करून बैठकीचे उद्दिष्ट सांगितले तर युवराज पवार यांनी सर्व उपस्थित असे मनःपूर्वक आभार मानले.



