सामाजिक

मारेगावच्या हेमंत लता शंकर बुजाडे यांची यशाला गवसणी

यवतमाळ – विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने कमालीचे झपाटले. त्यांच्या तत्वज्ञानाची कास धरत तब्बल 12 तास नियमित अभ्यास व पार्टटाईम जॉब करत चंद्रमौळी झोपडीतून ‘क्लास-वन’ सरकारी अधिकारी बनला. देशातील सर्वोच्च परीक्षेला यशस्वी गवसणी घालणाऱ्या हेमंतचे सर्वच स्तरातून अभिनंदनाने सर्वांसाठी प्रेरणास्रोताचा झरा ठरतो आहे.

मारेगावचा जिद्दीने पेटलेला, आत्मविश्वासाने झपाटलेला हेमंत. मारेगावातून दहावी झाल्यानंतर बारावी वणीतून झाला. यवतमाळ येथून मेकॅनिकल इंजिनिअर केल्यानंतर वडिलांच्या मृत्युनंतर उच्च पदाचा अभ्यास त्याला स्वस्थ बसू देत नव्हता मात्र आर्थिक परिस्थितीने खिळखिळे केले असतांना जबर आत्मविश्वासाने त्याने अभ्यासाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहर गाठले. काय करावं. कसं करावं? हे प्रश्न डोक्यात घोंगावत असतांना छोटीशी खोली भाड्याने घेतली. तोडक्या मानधनेवर जीम ट्रेनर म्हणून काम करीत बारा तासाचा सातत्यपूर्ण अभ्यास हेच त्याच्या यशाचे गमक ठरले.

हेमंत ने UPSC CAPF AC EXAM 2025 मध्ये ऑल इंडिया रँक (AIR)276 पटकावित assistant commandant (class – 1 Gazetted ) पद संपादन केले आहे.

हेमंत लता शंकर बुजाडे म्हणतोय, परिस्थितीला दोष न देता व खचून न जाता लढण्याची तयारी असली पाहिजे. तो म्हणतो भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षणाची व जिद्दीची प्रेरणा मला अंगीकारून गेलीय. त्यांच्या तत्वज्ञानाने माझ्यावर यशाचे लोटांगण घातले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button