सोलापूर

मुख्यमंत्री समृद्ध अभियानांतर्गत अतुल कुलकर्णी यांच्या सहकार्याने उंदरगागावामध्ये उभारली शाश्वत विकासाची गुढी 

 

करमाळा ( आयुब शेख ) मौजे उंदरगाव ता .करमाळा हे पुनर्वसित विभागातील गाव असून हे गाव पूर्वी शासनाच्या विविध योजना पासून वंचित राहिलेले होते परंतु मागील वर्षी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर व करमाळा तहसील कार्यातील कर्तव्यदक्ष तहसीलदार शिल्पाताई ठोकडे  तसेच करमाळा येथील डी .वाय.एस.पी मा.अंजना कृष्णा  तसेच करमाळा पोलीस स्टेशनचे पीआय रणजीत माने व करमाळा येथील गटविकास अधिकारी डॉ.अमित कदम ,गटशिक्षण अधिकारी मा.नितिन कदम,बालविकास अधिकारी .किरण सूर्यवंशी  आणि ग्रामपंचायत उंदरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने युवकाचा ध्यास ग्राम व शहर विकास हे ब्रीद वाक्य घेऊन शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते आणि या कालावधीमध्ये या गावांमध्ये स्वच्छता अभियान,वृक्षलागवड, प्लास्टिक मुक्तगाव,मतदान जनजागृती,आरोग्य शिबिर, घनकचरा व्यवस्थापन यासारख्या उपक्रमाचा शुभारंभ केलेला होता. यानंतर शिबिर संपल्यानंतर या गावांमध्ये मुख्यमंत्री समृद्ध अभियानाचा शुभारंभ झाला आणि याअभियानाच्या माध्यमातून गावांमध्ये स्वयंसंवक व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले गेले यामध्ये संपूर्ण गावाची स्वच्छता, गावाची रंगरांगोटी व शुशोभिकरण, स्मशानभूमीची स्वच्छता, मंदिर परिसरातील स्वच्छता, त्याबरोबरच बालवाडी अंगणवाडीची स्वच्छता यासारखे उपक्रम राबवले गेले त्याबरोबरच संपूर्ण गावातील कुटुंबांना कुटुंब प्रमुखाची नावे देण्यात आली व प्रत्येक चौकामध्ये त्या त्या भागामध्ये असणाऱ्या कुटुंबप्रमुखांची नावांचे बोर्ड लावण्यात आले. याबरोबरच मुख्यमंत्री समृद्ध अभियानाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक .अतुल कुलकर्णी  यांच्या माध्यमातून CSR फंडाच्या माध्यमातून या गावाचा चेहरा मोहरा बदलला गेला कारण या गावांमध्ये असणारी जिल्हा परिषदेची शाळा या शाळेसाठी असणाऱ्या भौतिक सुविधा सोलर सीसीटीव्ही कॅमेरे याबरोबरच या गावांमध्ये आवश्यक असणाऱ्या इतर शासकीय कार्यालयामध्ये सुद्धा सौरशक्तीचा वापर करण्यात आलेला आहे व सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी  यांच्या सहकार्यातून या गावांमध्ये अमुलाग्र अशा प्रकारचे बदल झाले. पोलीस अधीक्षक कुलकर्णी  यांच्या सहकार्यातून गावामध्ये 4000 पेक्षा अधिक वृक्ष लागवड करण्यात आली. याबरोबरच या गावांमध्ये आवश्यक असणाऱ्या ज्या भौतिक सुविधा रस्ते रस्त्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात करण्यात आली स्टेट लाईन याही सुविधा निर्माण करण्यात येत आहेत याबरोबरच या गावांमध्ये परसबाग त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सेंद्रिय पद्धतीची परसबाग विकसित झालेली आहे तसेच गावातील तरुणांना अभ्यासाची सवय लागावी या दृष्टिकोनातून अभ्यासिकेची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच गावातील तरुण आणि आबाल वृद्धांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी ओपन जिमची व्यवस्था ही गावांमध्ये निर्माण करण्यात आलेली आहे तसेच कुलकर्णी साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली 400 पेक्षा अधिक महिला व पुरुषाचे भव्य अशा प्रकारचा आरोग्य शिबिराचे आयोजन करून त्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणामध्ये या आरोग्य शिबिराचा फायदाही झालेला आहे अशा प्रकारचे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम मुख्यमंत्री समृद्ध अभियानाच्या माध्यमातून उंदरगाव मध्ये राबवले गेले आणि या संपूर्ण अभियानामध्ये लोक सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाला लोकसभागाच्या माध्यमातून गावामध्ये नाविन्यपूर्ण अशा प्रकारचे उपक्रम राबवले गेले आणि त्यामुळे आज उंदरगाव आदर्श ग्राम म्हणून महाराष्ट्रातील अनेक गावे उंदरगावकडे पाहत आहेत . अशी उंदरगावचे ग्रामविकास अधिकारी.यशवंत कुदळे उंदरगाव चे सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी दिली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button