सोलापूर
आरक्षण ‘उपवर्गिकरण विरोधात सोलापुरात विराट मोर्चा

सोलापूर ( प्रतिनिधी )आरक्षण ‘उपवर्गिकरण विरोधात सोमवारी सोलापुरात विराट मोर्चा काढण्यात आला.
दुपारी एक गाजणाऱ्या सुमारस भारतात्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथुन मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात सहभागी झालेल्या भीमसैनिकांच्या डोक्यावर निळ्या टोप्या व पंचशीलचे स्कार्फ, हातात निळे ध्वज आणि संविधान बचावाचे फलक दिसत होते. विविध सामाजिक संस्था आणि आंबेडकरवी संघटनांनी आपला कार्यक्रमसह उपस्थिती लावत आंदोलनाला पाठिबा दर्शविला. मोर्चाच्या मध्यभागी भारतात्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर चारचाकी वाहनात उभे राहून आंदोलकांना अभिव्यादन करत होते.
प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. तब्बल अडीच ते तीन तास चाललेल्या या मोर्चाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते जि. प. पूनम गेट हा संपूर्ण मार्ग व्यापाला. जिल्हातील विविध तालुके व गावांमधून आलेले हजारो भीमसैनिक, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी या मोर्चात सहभागी झाले.
जि. प. पूनम गेट येथे मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी शासनाने अनुसूचित जातींमधील उपवर्गिकरणाचा निर्णय तातडीने मागे
घ्यावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कृती समितीच्या नेत्यांनी दिला. याप्रसंगी कृती समितीच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर केले.
आंदोलनात आनंदराज आंबेडकर, माजी सामाजिक न्यायमंत्री आमदार राजकुमार बडोले, माजी सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप, चर्मकार विकास संघचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर , जालनाच्या रुक्मिणी लोढे आदीसह सोलापूर शहर जिल्ह्यातील नेते , पदाधिकारी , एस सी प्रवर्गातील नागरिक , महिला हजारोच्या संख्येने उपस्थित होते. 




