शैक्षणिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १८ तास अभ्यास अभियान संपन्न

पुणे ( प्रतिनिधी )
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मागील १७ वर्षांपासून DAPSA (डॉ. बाबासाहेब आंबेडकर पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स असोसिएशन) या संघटनेमार्फत “१८ तास अभ्यास अभियान” सातत्याने राबवले जात आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमाची संकल्पना DAPSA चे अध्यक्ष अमोलजी  सरवदे यांची असून सागर सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे १८ तास अभ्यास अभियान राबविण्यात आले. उद्घाटन प्रसंगी  प्रस्ताविकेमध्ये अमोलजी सरवदे यांनी आश्वासन दिले की, फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार महाराष्ट्रभर पोहोचवण्याचे कार्य ही संघटना सातत्याने करत राहील. तसेच या अभ्यास अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा संदेश पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान सागर सोनकांबळे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हटले की, “विद्यार्थी ही देशाची खरी शक्ती आहे. विद्यार्थी घडवणे म्हणजे देश घडवणे होय. फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम आमची संघटना करत आहे.
सदर १८तास अभ्यास उद्घाटन प्रसंगी 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. सुरेश गोसावी डॉ. पराग काळकर, मा.प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आंतरराष्ट्रीय केंद्राचे प्रमुख प्रा डॉ. विजय खरे, संचालक शिक्षणशास्त्र प्रशाला प्रा डॉ. विलास आढाव, प्रा डॉ. सदानंद भोसले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुधाकर बोकेफोडे,  डॉ. संजय कोळेकर, प्रा डॉ. गीता शिंदे, ॲड. क्रांती सहाने इत्यादी मान्यवर यांनी मनोगते व्यक्त केली.
सदर कार्यक्रमास डॉ. गणेश भामे, एन एस यु आय महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अक्षय कांबळे, विद्यापीठ विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष राहुल ससाणे, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुरज गायकवाड इ. मान्यवर तसेच विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष अमोल सरोदे, यांनी केले तर सुञसंचालन संघटनेचे कार्याध्यक्ष  सागर सोनकांबळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. मोहन कांबळे,  डॉ. सुनील गायकवाड, डॉ. अनिल पवळ,  निखिल सिद्धगणेश,  अक्षय कांबळे,  सुरज गायकवाड,  प्रा. राहुल रुही,  राहुल ससाणे, डॉ. जयकर गायकवाड,  दगडू सोनकांबळे,  समाधान दुपारगुडे, ॲड. आम्रपाली धिवार, ॲड. विवेक शाक्य,  तुकाराम शिंदे,  प्रज्योत गायकवाड ,गीता सगरे,  चंद्रकांत दुर्गे, उषा कांबळे, किरण भद्रे,  रोहित बनसोडे, सिद्धांत जांभुळकर   डॉ प्रज्ञानंद जांधळे, जयश्री कांबळे,  मयुर जावळे, डॉ सूर्यकांत गायकवाड, प्रशांत शिंदे, राजेंद्र नेमाने, समाधान सरवदे, लक्ष्मी कांबळे, मसाजी गायकवाड,  गणेश मोरे,  सुशांत धसाडे,  भगवान वाघमारे,  मिलिंद वाघमारे,  ओंकार बिनवडे, अभिषेक शेलकर, अभिजीत जाधव,  अरुण जाधव,  दिपक सुतार,  अशोक गोरे, गंगाधर मामिलवार,  गणेश गायकवाड, साहेबराव क्षीरसागर,  विनोद वाघमारे,  बसवराज सोनकांबळे, सुरज चव्हाण, इ कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button