सामाजिक
श्री स्वामी पुण्यतिथी महोत्सवानिमीत्त श्री स्वामी समर्थांच्या व मुळ चरण पादूकांसमोर हजारो स्वामी भक्त नतमस्तक

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
श्री स्वामी समर्थांचे साधना स्थान व मुळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आज श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्त
हजारो भाविक दिवसभरात स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. अनंतकोटी ब्रम्हांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय व अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय या अबाल वृद्धांच्या जयघोषात संपूर्ण आसमंत दुमदुमला. पहाटे ४ पासूनच श्रींच्या दर्शनाकरिता स्थानिक व परगावाहून आलेल्या भाविकांनी मोठया भक्तीभावाने व अपार श्रध्देने उपस्थिती दर्शवून अपार श्रद्धेने श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होत श्रींचे दर्शन घेतले. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने दक्षिण महाद्वारालगत बॅरेकेटींगची सोय करून, भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता कापडी मंडप उभारून विशेष सोय करण्यात आली होती.
पहाटे २ वाजता पारंपरिक पद्धतीने श्रींची मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत पुरोहित मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते श्रीं ची काकडआरती झाली. नगरप्रदक्षिणा वटवृक्ष मंदिर ते समाधी मठ ते पुन्हा मुख्य वटवृक्ष मंदिराकडे पहाटे ३ ते ४ या वेळेत निघाली. देवस्थानचे वतीने पारंपरिक लघुरुद्र सकाळी ६ वाजता पुरोहित मोहनराव गुरूजी पुजारी यांच्या अधिपत्त्याखाली मंदार महाराज पुजारी व ब्रम्हवृंदांच्या मंत्रोचारात भक्तीभावाने करण्यात आले. नामवीणा सप्ताह समाप्ती सोहळा ज्योतीबा मंडपात सकाळी ७ वाजता देवस्थानचे चेअरमन
व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांचे हस्ते सत्संग महिला भजनी मंडळाच्या भजनाने संपन्न झाला.
मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या व विश्वस्त पदाधिकारी प्रमुख उपस्थितीत पुरोहित मंदार महाराज पुजारी, व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता देवस्थानची महानैवेद्य आरती संपन्न झाली. दुपारी १२ वाजता अक्कलकोट राजघराण्याच्या वतीने श्रीमंत मालोजीराजे भोसले राजासाहेब यांच्या हस्ते व देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्तिथीत श्रींना महानैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर दुपारी १२ ते ४ या वेळेत देवस्थानच्या पूर्वेकडील उपहारगृह परिसरात व भक्त निवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात आले. हजारो स्वामी भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. दुपारी १ ते ४ या वेळेत कोल्हापुर येथील स्वामीभक्त सुहास पाटील, नितीन पाटील यांच्या अधिपत्याखाली कोल्हापूर येथील स्वामीभक्त मंडळींच्या वतीने विविध देवतांचे रूपे घेऊन अत्यंत मनमोहक अशा सोंगी भजनाने भक्ती भावाच्या स्वरात मंदिर परिसर दुमदुमले होते. दिवसभर सर्व स्वामी भक्तांना कमीत कमी वेळात सुलभतेने दर्शन होण्याकरिता समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी व सेवेकऱ्यानी प्ररिश्रम घेतले.
तत्पूर्वी श्री स्वामी समर्थ गुरुलीलामृत चरित्र पोथी पारायण सोहळ्याची समाप्ती, भजन सोहळा समाप्ती, धर्मसंकीर्तन सोहळ्याची समाप्ती करण्यात आली. भजन सेवा सोहळ्यात सोलापूर, पंढरपूर, वैराग, मंगळवेढा, लातूर, बार्शी, सांगोला, इत्यादी भागातून ४८ भजनी मंडळांनी आपली भजनसेवा अखंडपणे श्रींच्या चरणी समर्पित केली. धर्मसंकीर्तनात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वक्ते व कलावंतांनी आपली सेवा सादर केली. पारायण सेवा देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख, भजनसेवा
व धर्मसंकीर्तन सोहळा चेअरमन महेश इंगळे व ओंकार पाठक यांच्या अधिपत्याखाली संपन्न झाला.
यावेळी सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, सयाजीराजे भोसले, जयप्रभादेवी भोसले, राजपुरोहित पवन महाराज, गंगाधर कुंभार, गणेश दिवाणजी, मा.नगरसेवक बसलिंगप्पा खेडगी, नगरसेवक महेश हिंडोळे, राजकुमार मसुती, शशिकांत लिम्बीतोटे, शिवशरण अचलेर, प्रशांत गुरव, श्रीशैल गवंडी, संजय पाठक, संतोष देगावकर, स्वामीनाथ लोणारी, गिरीश पवार, संजय पवार, ऋषिकेश लोणारी, बाळासाहेब घाटगे, सागर गोंडाळ, वेदेश गुरव, अविनाश क्षीरसागर, प्रसाद सोनार, ज्ञानेश्वर भोसले, राजेश नीलवाणी, मनोज इंगुले, सैदप्पा इंगळे, जयप्रकाश तोळणूरे यांच्यासह असंख्य स्वामी भक्त उपस्थित होते. 




