सामाजिक

देशाची प्रगती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवरच झाली – आमदार सचिन कल्याणशेट्टी

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे वाचन प्रेमी होते. वाचन आणि ज्ञानामुळेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला मार्गदर्शन केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला घडविण्याचे काम केले. त्यांच्या विचारधारेमुळे देश प्रगती पाथावर आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकराच्यां वाचन आणि ज्ञान याचा फायदा देशाला झाला. डॉ आंबेडकर हे मंत्री असताना जलनिती , कामगार कायदे केले. त्याचे विचार कतृत्व अथांग आहे . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेत समाजाला शिक्षित करा. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे  तळागाळात विचार पोहचविण्याचे काम करा असे मार्गदर्शन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. तसेच आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी  वळसंग येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी  विहिरीवर पाणी पिलेल्या विहिरीच्या संवर्धनासाठी ७५ लाख रुपये निधी दिला. एक प्रेक्षनिय स्थळ निर्माण करण्यात येत आहे. समाजाचा सेवक म्हणून काम करत राहणार असून  आंबेडकरी समाजाने एकत्र राहावे. समाजाला पुढे घेऊन जाण्याचे काम करा. मी तुमच्या सोबत आहे. भीमनगरमध्ये महात्मा बसवेश्वर मंदिरात सभा मंटपासाठी भरीव निधी देऊ अशी ग्वाही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.

अक्कलकोट शहरातील भीमनगर येथे विश्वरत्न , महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे दि. १४ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी व मान्यवराच्यां उपस्थितिमध्ये अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी बोलत होते. या कार्यक्रमास नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी , उपनगराध्यक्ष बंटी राठोड , नगरसेवक तथा श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे , नगरसेवक अविनाश मडिखांबे, नागराज कुंभार यशवंत धोंगडे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले , माजी सरपंच प्रदीप पाटील ,अप्पू पराणे , ननू कोरबू , नाविद डांगे , शैलेश राठोड , महेश हिडोळे , वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे , रुद्रय्या स्वामी , नगरसेवक अशोक जाधव , छात्रभारतीचे एड. सचिन बनसोडे , माजी नगरसेवक उत्तम गायकवाड , पत्रकार स्वामीराव गायकवाड , राजेश जगताप नगरसेवक बबलू कामनूरकर ,  अजय मुकणार , सुनील सिद्धे,  सचिन स्वामी,. सचिन शिंदे, एड.. विजय हर्डीकर , उद्योजक सिद्धाराम टाके , अभिषेक लोकापुरे आदीची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवराच्यां हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीस अभिवादन करण्यात आले. जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्याच्या हस्ते मान्यवराचां सत्कार करण्यात आला.
महेश इंगळे यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवर देश चालतो. भारत देश पुढील काळात  महासत्ताक होणार आहे. हे डॉ बाबासाहेबामुळे त्यांच्या विचारधारेमुळेच. वाचला तर वाचला सर्वानी वाचन केलं पाहिजे. वाचणाराच समाजाला मार्ग दर्शन करू शकतो. संविधान आपण सर्व जाणतोच, या संविधानामुळेच प्रगती होत आहे असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी नगरसेवक महेश हिंडोळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच भीमनगरमधील चिमुकल्यांनी मराठी आणि इंग्रजीतून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषण करून उपस्थिताचीं मने जिंकली.
या कार्यक्रमास डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती अध्यक्ष  नितेश मडीखांबे,विजय मडीखांबे,अजय मडीखांबे,प्रनेश बनसोडे,शुभम मडीखांबे, योगेश मडीखांबे, ,भारत मडीखांबे . राहुल रुही, .सतीश सुतार, .दशरथ मडीखांबे, स्वामी गायकवाड, पंच कमिटी दत्ता मडीखांबे, कल्याणी घाटगे,भारत सोनकांबळे,विजयकुमार बाळशंकर,उदय सोनकांबळे,सचिन मेजर मडीखांबे,शिवशरण शिंदे,बाळासाहेब मडीखांबे,शिलामानी बनसोडे,पंकज मडीखांबे,सिद्धार्थ बनसोडे, सिद्धार्थ साळे, प्रशांत मडीखांबे,विशाल सोनकांबळे, नागेश मडीखांबे, साई गायकवाड, भिम मडीखांबे, सचिन बनसोडे, शाम घटगे, दत्ता शिंदे, लखन वेस्कर,अप्पू गायकवाड,स्वामीराव मडीखांबे, आकाश मडीखांबे,दिनेश रुही,बंटी मडीखांबे,अंबादास बनसोडे, महादेव बनसोडे,सागर सुतार,रोहित वाघमारे, अमित बनसोडे,आदींसह नागरिक महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button