शैक्षणिक
अक्कलकोट तालुक्यात एकाच शाळेत दोन विज्ञान पदवीधर शिक्षकाची बेकायदेशीरपणे नियुक्त

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा आंदोलनाचा इशारा
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट तालुक्यातील जि. प. प्रा. कन्नड मुलींची शाळा मैंदर्गी ता. अक्कलकोट जि.सोलापूर येथे बेकायदेशीर पणे एकाच शाळेत दोन विज्ञान पदवीधराची नियुक्त केलेली असुन, १ विज्ञान पदवीधर शिक्षक पुर्वीपासुन असताना
जानेवारी २०२५ मध्ये पुन्हा दुसऱ्या शिक्षकाची बेकायदेशीरपणे नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदरील शाळेत दोन विज्ञान शिक्षक पात्र नसताना विनाकारण सदर शाळेत पंचायत समिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करुन तोंडी आदेश देऊन एका शिक्षकाची नियुक्त केलेली आहे. गेल्या १ वर्षापासुन नियमबाह्य प्रतिनियुक्त प्रकरण संपूर्ण जिल्ह्यात गाजत असताना सुध्दा प्रभारी गटशिक्षणाधिकारी आपल्या पदाचा पुन्हा एकदा दुरुपयोग केल्याचे शिक्षकाचे हजेरीवरुन आढळुन आलेले आहे.
सदरील शाळेतील मुख्याध्यापक यांनी सदर शिक्षकाला कोणत्या आधारे हजर करुन घेतले याबाबत देखील आपण सखोल चौकशी करावी. अक्कलकोट तालुक्यात विज्ञान व गणित शिक्षकाचे १० जागा रिक्त असताना एकाच शाळेत दोन विज्ञान शिक्षकांची नियुक्ती करण्याचे कारण काय ? आहे याचा प्रश्न निर्माण होत आहे.अक्कलकोट तालुक्यात एकाच शाळेत दोन विज्ञान पदवीधर शिक्षकाची बेकायदेशीरपणे नियुक्त करण्यात आल्याने
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष महांतेश कट्टीमनी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या प्रकरणी तात्काळ दखल संबंधीत शिक्षकाची व
प्र. गटशिक्षणाधिकारी यांची खातेनिहाय सखोल चौकशी करावी व चौकशी अंती प्रचलित कायद्यान्वये कारवाई करावी व केलेल्या कारवाईचा अहवाल संघटनेस ८ दिवसाचे आत देण्यात यावा अन्यथा
प्र. गटशिक्षणाधिकारी यांना पाठीशी घातल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर (पुनमगेट)
समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन संघटनेचे अध्यक्ष महांतेश कट्टीमनी यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी , जि. प. सोलापूर
शिक्षणाधिकारी (प्राथ) जि. प. सोलापूर यांना दिले आहे.



