राजकीय

वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मोठ्या ताकतीने लढवणार

वंचितच्या बैठकीत निर्धार
अक्कलकोट (प्रतिनिधी,)-आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात अक्कलकोट वंचित बहुजन आघाडी शहर व तालुक्याच्या वतीने बैठक घेण्यात आला होता. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद च्या निवडणुका मोठ्या ताकतीने सामोरे जाणार  असून निवडणुकी ची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. अनेक इच्छुक उमेदवार वंचित बहुजन आघाडी च्या वतीने लढवण्यास इच्छुक असून त्यासंबंधीच्या अहवाल पक्षाकडे सादर करण्यात आलेला आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळातील वंचित समूहातील प्रत्येक व्यक्तीला सत्तेत सहभाग करून घेण्यासाठी जी दिवस रात्र एक करत आहेत त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तळागाळातील वंचित समूहातील लोकांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवणार आहे असे प्रतिपादन जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे यांनी केले.
        तत्पूर्वी ग्वल  समाजाचे नेते सतीश चिंचोळे आणि वडार समाजाचे नेते कल्याणी चौगुले यांचा  वंचित बहुजन आघाडी या पक्षात प्रवेश घेण्यात आला. या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करण्यात आले. सर्व कार्यकर्ते येणाऱ्या निवडणुकीस ताकदीने सामोरे जाण्यास सज्ज झालेले आहेत. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा सुद्धा करण्यात आली आणि जे कोणी इच्छुक उमेदवार असतील जे निवडणुकीसाठी तयार असतील त्यांनी वंचित बहुजन आघाडी यांच्याशी संपर्क सुद्धा साधावा असे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले. ग्रामीण भागातील  प्रत्येक गावातील एक कार्यकर्ता या बैठकीस उपस्थित होता. शहरातील व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. युवक आघाडी भारतीय बौद्ध महासभा चे पदाधिकारी कामगार आघाडीचे पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button