शैक्षणिक
मंगरूळे प्रशालेचा कृष्णा सुरवसे दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम

अक्कलकोट – (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी च्या परीक्षेत के. एल. ई. संचलित मंगरूळे हायस्कूल अक्कलकोट चा निकाल ९७ % इतका लागला असून या प्रशालेचा विद्यार्थी तथा बोरगाव चे माजी सरपंच विलासअप्पा सुरवसे यांचा नातू कृष्णा प्रकाश सुरवसे याने ९७.८०% गुण प्राप्त करून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. या उज्वल यशाबद्दल त्याचे शहर तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. कृष्णा हा खेडगी महाविद्यालय अक्कलकोट येथील प्रा. प्रकाश सुरवसे यांचा चिरंजीव आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अमित कोरे, स्थानिक नियमक मंडळ अध्यक्ष अनिल पट्टेद, स्थानिक नियमक मंडळ सदस्य ऍड. अनिल मंगरूळे, मुख्याध्यापक नंदाजी कदम, उपमुख्याध्यापक गिरीश पट्टद, पर्यवेक्षक आरती तोळनुरे यांनी अभिनंदन केले. वर्गशिक्षक प्रशांत पाटील, रमेश उमाटे, सचिन डफळे, संजय चितली, आशिष खजूरे, रेवती पाटील, विश्वजीत पाटील, विश्वनाथ पाटील, नेवाळे सर, संतोष आगरखेड, धानय्या कौन्टगी, यांच्या मार्गदर्शनाखाली सदर यश मिळवले.






