राजकीय
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते बादोला येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट तालुक्यातील बादोला येथे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या निधीतून मंजूर झालेल्या व पूर्णत्वास गेलेल्या श्री नृसिंह मंदिर आणि श्री पांडुरंग मंदिराच्या कामांसह विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी या कामांमुळे गावाच्या पायाभूत आणि आध्यात्मिक सुविधांमध्ये चांगला विकास होणार असून, आगामी काळात देखील अशा विविध विकासकामांच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी कार्यरत राहीन असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी . धनराज बिराजदार, . सिद्धाराम बगले, श्री. सिद्धाराम बिराजदार, . अप्पू बिराजदार, आनंद तानवडे, . सुनील कळके, . अमोलराजे भोसले, . शिवशरण जोजन, राजकुमार बंदिछोडे, . अमोल हिप्परगी, . सुनील खेड, . रामचंद्र अरवत, . सिद्धाराम मठपती, . सुरेश गड्डी, . बाबुराव करपे, . सागर हिप्परगी, . अजित सुतार,. बसवराज शेळके, शिवाजी पाटील, . श्रीमंत कुंटोजी, . दत्ता धर्मसाले, सुधाकर वाकडे, . प्रदीप जगताप, . विठ्ठल कट्टे, . सचिन घुगरे, . सुनील सावंत, वीरभद्र स्वामी आदीसह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



