सोलापूर

अर्थसंकल्पातून दक्षिण सोलापूरसाठी २५ कोटींचा निधी; आमदार सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

 

सोलापूर ( प्रतिनिधी ) : राज्याच्या अर्थसंकल्पातून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार सुभाष देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाला असून त्यामुळे मतदारसंघातील रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासकामांना गती मिळणार आहे.

मंजूर निधीतून इंगळगी ते जेऊर धुबधुबी तलाव पुलाचे बांधकाम करण्यासाठी ६ कोटी रुपये, बरुर–हत्तरसंग–कुडल रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी ४ कोटी रुपये, मंदूप–माळकवठे–सादेपूर–बाळगी रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी ५ कोटी रुपये, भंडारकवठे–माळकवठे रस्त्याची दुरुस्ती व काँक्रीटीकरण करण्यासाठी ५ कोटी रुपये तसेच निंबर्गी–कंदलगाव रस्त्याची दुरुस्ती व काँक्रीटीकरण करण्यासाठी ५ कोटी रुपये असा एकूण २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या निधीमुळे दक्षिण सोलापूर मतदारसंघातील ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुकर होणार असून नागरिकांना चांगल्या रस्ते व वाहतूक सुविधांचा लाभ मिळणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारने मंजूर केलेल्या या निधीबद्दल आमदार सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री व राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button