सामाजिक

अक्कलकोट विधानसभेच्या सात रस्त्यास २५ कोटी रुपये निधी

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट विधानसभेच्या सात रस्त्यास २५ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील
अरळी गावाजवळ पुलाचे बांधकाम करणे ३.५ कोटी,बोरेगाव ते हन्नूर रस्ता सुधारणा करणे ७.५ कोटी,सातनदुधनी ते उडगी रस्ता सुधारणा करणे ४.५ कोटी, चुंगी ते कुरनूर रस्ता सुधारणा करणे २ कोटी, शावळ पूल ते शावळ गाव रस्ता सुधारणा करणे ५० लाख रुपये,वळसंग ते तीर्थ रस्ता सुधारणा करणे ५.५ कोटी,धोत्री ते गोकुळ साखर कारखाना रस्ता सुधारणा करणे  १.५ कोटी अशा एकूण सात रस्त्यांच्या कामाच्या दर्जा उन्नतीस एकूण २५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री . देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पातून अक्कलकोट तालुक्यातील विविध विकासकामांसाठी सुमारे ₹२५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून तालुक्यातील रस्ते सुधारणा, पूल बांधकाम तसेच पायाभूत सुविधांच्या कामांना गती मिळणार असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानात मोठा सकारात्मक बदल घडणार आहे.
विकसित महाराष्ट्र – २०४७ या दूरदृष्टीसमोर ठेवून राज्य सरकारकडून ग्रामीण आणि शहरी भागातील विकासाला समान प्राधान्य दिले जात आहे. अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मंजूर झालेला हा निधी निश्चितच विकासाची नवी दिशा देणारा ठरेल अशी प्रतिक्रिया देत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकारचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button