नरसी येथे भाजपा महिला मोर्चातर्फे ‘उत्कर्षिनी सन्मान सोहळा’ उत्साहात

नायगाव / नांदेड ( :- सय्यद अजिम नरसीकर )जागतिक महिला दिनानिमित्त. नायगाव तालुक्यातील नरसी येथे भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने ‘उत्कर्षिनी सन्मान सोहळा’ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यात परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद माजी अध्यक्ष .सौ. मंगाराणी आंबुलगेकर, कुंडलवाडी नगराध्यक्षा. सौ प्रेरणा कोटलवार. नांदेड नगरसेविका. शांभवी प्रवीण साले.सौ प्रतिभा धानोरकर. सौ सोनालीताई हंबर्डे. पल्लवी वडजे.सौ. सुमतीताई व्याह्याळकर, सौ. मंगलाताई धुळेकर, सौ. शितलताई भालके, सौ. अनिता इंगोले, सौ. महादेवी मठपती तसेच सौ. चित्राताई गोरे. यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील वाढत्या सहभागाबद्दल समाधान व्यक्त केले. महिलांनी विविध क्षेत्रांत पुढे येऊन समाजाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.कार्यक्रमादरम्यान सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी सन्मानित करण्यात आलेल्या महिलांमध्ये कै आशा लक्ष्मण नुन्नेवाड. (आदर्श माता) सौ ताराबाई बोंमनाळे. डॉ राजशी संतोष पाटील. कुंटूरच्या आरोग्या विभागातील सौ सुजाता कैलास तेलंग. शेळगाव गौरीच्या चे पोलीस पाटील सौ सुनंदा मोहनराव पाटील. महीला संघटनेच्या सचिव ( सर्व उत्कृष्ट ग्रामसखी ) सौ संगीता सुभाष जाधव. ( राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष कामई देवी भावी संस्थेचे अध्यक्ष ) रेखाताई बनसोडे.( कुंटूर ग्रामसखी ) सौ रेखाताई मालु कांबळे. ( ग्रामसघ कोषाध्यक्ष)मन्नाबी नजीर शेख.(प्रभागसंघ अध्यक्ष ) तयबा एजाज शेख .( उद्योजकता महिला K G N गट उद्योजकता गट व 20 लाखाचा ट्रेन ओवर केलेला गट) शहनाज अन्वर चौधरी .( सर्व उत्कृष्ट गट ) अनुसया माता गट .( सर्व उत्कृष्ट गट ) बालाजी म.ब.गट. ( सामाजिक कार्यकर्ता पचफुला वडे .(अंगनवाडी कार्यकर्ता) अनिता रीजतवाड. भाजपा महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित. होत्या.या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ. अनिताताई चोंडिकर यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केले.


