देश - विदेश

संसद भवनासमोर काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांचे आंदोलन; “देशाला नेतृत्व हवे, मौन नको “

 

संसद भवन परिसरातील आंदोलनात खासदार प्रणिती शिंदे यांचा सहभाग

नवी दिल्ली -देशातील वाढते इंधन दर, आखाती देशांतील तणाव आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम याच्या निषेधार्थ विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार प्रियांकाजी गांधी, सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस व विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शने केली.

यावेळी खासदारांनी हातात विविध घोषवाक्यांचे फलक घेऊन केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका केली. “Gulf Burning, Oil Shock, Indians Stranded – India Needs Leadership, Not Silence”, “देश को नेतृत्व चाहिए, मौन नहीं”, “मोदी जी कुछ बोलिए, 46 लाख देशवासी गल्फ में फंसे हैं” अशा आशयाचे फलक आंदोलनादरम्यान दाखवण्यात आले.

विरोधी पक्षांच्या खासदारांनी आखाती देशांतील तणावामुळे वाढलेल्या तेलदरांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला. या विषयावर केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी तसेच संसदेत सविस्तर चर्चा घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

आंदोलनादरम्यान खासदारांनी घोषणाबाजी करत सरकारने मौन न बाळगता देशासमोरील परिस्थितीवर तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button