जेष्ठ पत्रकार गोविंद नरसीकर यांचा वाढदिवस साजरा

नायगाव / नांदेड : (- सय्यद अजिम )भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा नांदेड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत नरसी येथील जेष्ठ, निर्भीड पत्रकार गोविंद टोकलवाड नरसीकर यांचा वाढदिवस गुरुवार दि. ५ मार्च २०२६ रोजी नरसी येथील भाजपा कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा नेते तथा माजी पंचायत समिती सभापती श्रावण पाटील भिलवंडे यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते केक कापून आणि केक भरवून गोविंद नरसीकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या पत्रकारितेतील धडाडीच्या, वस्तुनिष्ठ आणि समाजाभिमुख कार्याचे मनापासून कौतुक केले.
याप्रसंगी बोलताना माजी मंत्री डी. पी. सावंत यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना आवाज देणारी पत्रकारिता करणे ही मोठी सामाजिक जबाबदारी आहे. जेष्ठ पत्रकार गोविंद नरसीकर यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील अनेक प्रश्नांना न्याय देत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. ते निर्भीडपणे पत्रकार म्हणून काम करत आहेत. असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी भाजपा नेते श्रावण पाटील भिलवंडे यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, गोविंद नरसीकर यांच्या लेखणीतून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा मिळाली आहे. पत्रकारितेतील त्यांची प्रामाणिकता, धाडस आणि समाजाशी असलेली बांधिलकी यामुळे त्यांनी या क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र आणि सन्माननीय ओळख निर्माण केली आहे.
नायगाव तालुक्यात अनेक ठिकाणी गोविंद नरसीकर यांचा वाढदिवस साजरा करत शुभेच्छा दिल्या यावेळी जेष्ठ पत्रकार सुर्यकांत सोनखेडकर, पंडीत वाघमारे, नरसी येथील पोलीस पाटील इब्राहिम बेग पटेल, श्री तुळजाभवानी जिनिंग अँड प्रेसिंगचे संचालक वसंतराव कस्तुरे, गंगाधर गंगासागरे, कैलास तेलंग, आनंदराव सुर्यवंशी, शेषराव कंधारे, ज्ञानेश्वर तोडे, प्रल्हाद भंडारे, गणेश कंदुरके, लोहगाव येथील गंगा लॉन्सचे मालक रमेशजी शेटकर, दत्ता पाटील होटाळकर, नरसी येथील उद्योजक साईनाथ अक्कमवाड, सामाजिक कार्यकर्ते त्र्यंबक डाके, भाजपा कार्यकर्ते डी. बी. भिलवंडे, मारोतराव बुके, लक्ष्मण बोधने, व्यंकट नागेश्वर.पत्रकार सय्यद अजिम नरसीकर. यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी गोविंद नरसीकर यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात अधिक यश मिळावे, अशा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. मित्रपरिवार, सहकारी पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा गौरव केला.



