सामाजिक

सोलापुरात वीज महावितरण कार्यालयात अनागोंदी कारभार

ग्राहक नागरिकाना मानसिक त्रास व आर्थिक भुर्दंड…..!

सोलापूर (रमेश सुरवसे): राज्यांमध्ये “स्मार्ट मीटर्स”च्या विरोधात नागरिकआंदोलन करुन तीव्र संताप व्यक्त करत आहेत.असे असताना सोलापूर शहरात ही, वीज महावितरण कार्यालयात चुकीच्या वाढीव वीज बिलाबाबत तसेच इतर तक्रारीबाबत वीज ग्राहक नागरिकांना अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराबाबत हेलपाटे मारुन मानसिक त्रास सहन करून आर्थिक भुर्दंड सहनकरावा लागत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे वीज ग्राहक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वीज वितरण कंपनीच्या वाढीव बिलाच्या अनागोंदी कारभारा विरोधात तक्रार करणाऱ्या ग्राहक नागरिकांना याचा वाईट अनुभव येत आहे. नेहमी घरगुती वीज वापरणाऱ्या ग्राहकांना वीज बिल एक महिन्यानंतर साधारण सरासरी युनिटसवर साधारण बिल येते. ग्राहक नागरिकांनी विज बिल भरले की, दुसऱ्या महिन्यात दुप्पट तिप्पट विज बिल येते याबाबत वीज ग्राहक नागरिक शहर वीज महावितरण कार्यालयात चौकशीसाठी गेल्यानंतर समोरच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सांगतो की”माझे घरगुती वीज मीटर असताना घरामध्ये कुठलाही जादा उपकरणाचा वापर झालेला नाही. तेव्हाही दुप्पट तिप्पट बिल कसे का आले? हे चुकीच्या मिटररिडींगमुळे वाढीव बिल आले आहे का? सदर वाढीव वीजबिला मुळे, आम्हाला आर्थिक भुर्दंड बसत आहे. तेव्हा कर्मचारी उत्तर देतात की”हा सिस्टीमचा भाग आहे तुम्हाला तेवढे बिल भरावेच लागेल”. असा अनुभव वीज ग्राहक नागरिकांना येत आहे.

दुसरे उदाहरण असे आहे की,:
———————————–
पिवळे बॉक्समध्ये मिटरबसवलेले आहे ते परत पूर्वीच्या ठिकाणी बसवावे:

शहरातील प्रभाग क्रमांक १ एक मधील प्रभाकर महाराज मंदिराजवळ तीन, चार ठिकाणी ग्राहक नागरिकांचे मिटरघरामधून काढून ते, लाईटच्या खांबावर पिवळ्या बॉक्स मध्ये लावलेले आहेत. पुन्हा ते मिटर पूर्विच्या ठिकाणीच बसवावे असे निवेदन येथील वीज ग्राहकांनी लोकप्रतिनिधींना तसेच वीज वितरण कार्यालयाकडे लेखी निवेदन देऊन मागणी केलेली आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
ग्राहक नागरिकांच्या मिटरची,व वाढीव बिलाची प्रत्यक्ष तपासणी करावी तसेच सदोष मिटर तात्काळ बदलावे, तसेच वीज मिटर जंपिंग होत आहे का (सीपीएल)याचीही तपासणी करावी.चुकीच्या बिलाची दुरुस्ती करून सुधारित बिल देण्यात यावे. तसेच वीज ग्राहक नागरिकांच्या इतर तक्रारी अर्जाबाबत तात्काळ दखल घ्यावी तसेच वीज ग्राहक नागरिकांच्या तक्रारींची पुर्ण पणे पडताळणी होई पर्यंत कोणतीही कारवाई करु नये अशी सुचना स्थानिक शाखेच्या वीज वितरण कर्मचाऱ्यांना द्यावी अशी मागणी वीज ग्राहक नागरिकामधून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button