Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

लायन्स क्लबचे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद – आमदार सचिन कल्याणशेट्टी

Admin by Admin
July 18, 2026
in सामाजिक
0
लायन्स क्लबचे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद – आमदार सचिन कल्याणशेट्टी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी उत्साहात संपन्न
अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट लायन्स क्लब ची स्थापना ही माझ्या जन्माच्या नऊ-दहा वर्ष अगोदर आहे आज लायन्स क्लबच्या स्थापनेला ५५ वर्षे होऊन गेली आहेत .अक्कलकोट सारख्या सीमावर्ती भागात लायन्स क्लब ने शैक्षणिक जाळे विणले आहे. लायन्स क्लब ही आंतरराष्ट्रीय संघटना असून या संघटनेचे देशाच्या व समाजाच्या विकासात मोठे योगदान आहे. जागतिक स्तरावर लायन्स क्लबचे सर्व क्षेत्रात काम सुरू आहे. लायन्स क्लबचे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असून हे कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा गुरुवार, दि. १६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता अजिंक्य तारा बँक्वेट हॉल येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात व दिमाखात पार पडला. याप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमास अक्कलकोट नगरीचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी , श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले , लायन्स इंटरनॅशनलचे प्रथम उपप्रांतपाल मंगेश दोशी , श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे सचिव शामराव मोरे , विश्वस्त भाऊ कापसे , दिलीप सिद्धे, पीडीजी ला. राजशेखर कापसे , लायन्स क्लबचे झोन चेअरमन स्वामीनाथ कलशेट्टी , रिजन चेअरमन महेश नळे ,श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, वटवृक्ष मंदिराचे अध्यक्ष  महेश  इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या सोहळ्याचे शपथविधी अधिकारी म्हणून लायन्स इंटरनॅशनलचे प्रथम उपप्रांतपाल मंगेश दोशी यांनी उपस्थित नूतन पदाधिकाऱ्यांना शपथ देत अल्पावधीत प्रभावी मार्गदर्शन केले.
यावेळी अध्यक्षपदी ला. अभय खोबरे यांनी शपथ घेतली. सचिवपदी ला. शिरीष पंडीत, सहसचिवपदी ला. शिवशरण खुबा, खजिनदारपदी ला. विठ्ठल तेली, सहखजिनदारपदी ला. संतोष जिरोळे, प्रथम उपाध्यक्षपदी ला. चेतन जाधव, तसेच संचालक जनमेजयराजे भोसले, ला. प्रभाकर मजगे, ला. शिवपुत्र हळगोदे, ला. सुभाष गडसिंग, ला. मल्लीनाथ साखरे, ला. राजेंद्र हत्ते, ला. मसुती, ला. आळगी, ला. शदीद वळसंगकर , ला सिद्धय्या मठ , ला डॉ प्रदीप घिव्हारे , ला. सुनिल बिरादार , ला सुधीर माळशेट्टी व शिवानंद नंदर्गी , ला. बाबासाहेब निंबाळकर , ला. राजशेखर हिप्परगी यांची नियुक्ती करण्यात आली. टेल ट्विस्टर म्हणून ला. कमल अल्लोळी यांनी शपथ घेतली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत समाजसेवेच्या कार्यात अधिक जोमाने कार्य करण्याचे मार्गदर्शन केले.  तसेच  दिलीप सिद्धे, ला . स्वामीनाथ कलशेट्टी , महेश नळे आदीनी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी नूतन अध्यक्ष अभय खोबरे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच ला. शिरीष पंडित यांनी अहवाल वाचन केले. मित्र परिवारातर्फे नूतन अध्यक्ष ला. अभय खोबरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व उत्साहपूर्ण वातावरणामुळे संपूर्ण सोहळा संस्मरणीय ठरला. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे , ला. महेश गायकवाड , ला. निकम , रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष किरनळळी , दिनेश पटेल , दत्ता कटारे , विलास कोरे , संतोष भोसले , प्रशांत विभुते , नगरसेवक प्रविण शहा , पिंटू साठे , विश्वनाथ पाटील , मल्लिनाथ आळगी , संतोष वगाले , विश्वनाथ हडलगी , धनंजय गाढवे आदीसह लायन्स क्लबचे पदाधिकारी , सदस्य , प्रतिष्ठीत नागरिक व महिला उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला. सुभाष गडसिंग यांनी केले.शेवटी ला. विठ्ठल तेली यांनी उपस्थितांचे आभार मानले. 
Previous Post

प्रखर वास्तववादी कादंबरीकार बाबुराव बागुल

Next Post

सौर प्रकल्पांसाठी हजारो झाडांची कत्तल; प्रतिपूरक वृक्षलागवड कुठे ? प्रशासनाला भारतीय लहुजी  सेनेचा थेट सवाल!

Admin

Admin

Next Post
सौर प्रकल्पांसाठी हजारो झाडांची कत्तल; प्रतिपूरक वृक्षलागवड कुठे ? प्रशासनाला भारतीय लहुजी  सेनेचा थेट सवाल!

सौर प्रकल्पांसाठी हजारो झाडांची कत्तल; प्रतिपूरक वृक्षलागवड कुठे ? प्रशासनाला भारतीय लहुजी  सेनेचा थेट सवाल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157243
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697