सामाजिक
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात नियोजित प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त, सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय..! श्री अन्नपूर्णा देवी, श्री लक्ष्मी नारायण नामाच्या जयघोषात, संपूर्ण देशात अन्न हे पूर्णब्रह्माची साक्ष देणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या धर्मादाय न्यास संस्थेचा ३९ वा. वर्धापन दिन व श्री गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाचे औचित्य साधून नव्याने होत असलेल्या महाप्रसादगृहाच्या इमारती लगत ५ मजली न्यासाच्या नियोजित प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन सोहळा न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाला.
दरम्यान रविवारी विरक्त मठाचे श्री म.नि.प्र. पूज्य बसवलिंग महास्वामीजी, जेष्ठ ख्यातनाम गायिका उषाताई मंगेशकर, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मुख्य पुजारी प.पू. मोहन पुजारी, श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुजारी वे.शा.सं. अण्णू महाराज पुजारी , साई ग्रुप, साईसुश्रुत कन्सट्रक्शन, पुणे संस्थापक अध्यक्ष- अरुण आडकर, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, खजिनदार लाला राठोड, विश्वस्त भाऊ कापसे, संतोष भोसले, राजेंद्र लिंबीतोटे, शुभम नांगरे, पालखी संयोजक, नाशिक, मुख्य कार्यकारी अधिकारी, रामदास तांबे, प्रकल्प संचालक इंजी.प्रशांत काळे, राजेंद्र पाटील, ऋषिकेश शिंदे, समर्थ कुंभार, न्यासाचे बाबुराव चौगुले आदीजन उपस्थित होते.
नियोजित प्रशासकीय इमारत –
नव्याने होत असलेल्या महाप्रसादगृहा लगत सदरची नियोजित प्रशासकीय इमारत सुसज्ज असणार आहे. यामध्ये स्वागत कक्ष, प्रशासकीय कामकाज, व्यवस्थापकीय दालन, प्रवेश कक्ष, कार्यालय, सभागृह, भांडार, अतिथी भोजन कक्ष, विशेष अतिथी भोजन कक्ष, तळ मजला, अतिथी कक्ष, विशेष अतिथी कक्ष अशा विविध व्यवस्थेने सुसज्ज अशी प्रशासकीय इमारत असणार आहे. ही प्रशासकीय इमारत भक्ताभिमुख असणार आहे.
एक दृष्टिक्षेप- नव्याने बांधण्यात येणाऱ्या नियोजित महप्रसादगृहाच्या वास्तूवर : –
नियोजित महाप्रसाद गृहाची इमारत, भव्य आणि मंदिर सदृश्य असणार आहे. ही इमारत पूर्णपणे वातानुकुलित असून या इमारतीचे बांधकाम क्षेत्र १ लाख १९,३९८ चौरस फुट असणार आहे. इमारतीच्या टेरेसवर श्री स्वामी समर्थांची ५१ फुटांची सुंदर, रेखीव आणि भव्य मुर्ती, सर्वांचे लक्ष वेधून घेईल. या नवीन नियोजित महप्रसादगृहात २५०० भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था असून, या आराखड्याच्या माध्यमातून हे पाहू शकता की, एकूण ५ हजार भाविकांसाठी बसून सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा प्रतिक्षा कक्षाचे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय या इमारतीच्या तळघरामधे धान्य- भाजीपाला कोठार, चटणी व पिठाची गिरणी तसेच १ तासामध्ये ८०० चपाती तयार करता येणाऱ्या ७ मशिन्स, आणि भांडे धुण्यासाठी डिश वॉशर यांची देखील सोय आहे. संपूर्ण इमारतीमध्ये अग्निशामन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. ही सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज व प्रशस्त इमारत, स्वामी भक्तांच्या देणगीतून साकार होत आहे. या बांधकामाचा सर्वसाधारण अंदाजे खर्च रुपये ६० कोटी, इतका अपेक्षित आहे. सदर इमारतीस नगरपालिकेची रीतसर बांधकाम परवानगी घेतली आहे. सध्या गेल्या नोव्हेंबर-२०२४ पासून सदरचे काम प्रगतीपथावर आहे, येत्या २ वर्षात हे महाप्रसादगृह भक्तांच्या सेवेत असणार आहे.
यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई जनमेजयराजे भोसले, अर्पिताराजे अमोलराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, कु. तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, कु. स्वामिनीराजे अमोलराजे भोसले, स्मिता कदम, पल्लवी कदम, उज्वला भोसले, संगीता भोसले, रूपा पवार, स्वप्ना माने, कविता वाकडे, सुवर्णा घाडगे, राजश्री माने, क्रांती वाकडे, धनश्री पाटील, सरोजनी मोरे, दिव्या मोरे, कल्पना मोरे, कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, प्रथमेश इंगळे, प्रा. शरणप्पा आचलेर, मनोज निकम, प्रवीण देशमुख, शितल फुटाणे, सुमित घाटगे, रोहित खोबरे, अरविंद शिंदे, सौरभ मोरे, शिवराज स्वामी, राहुल गांधी, निखील पाटील, बाळासाहेब कुलकर्णी बबलादकर, मैनुद्दीन कोरबू, अतिश पवार, प्रवीण घाडगे, गोटू माने, बाळासाहेब घाटगे, बाळासाहेब पोळ, कुमार सलबत्ते, शहाजीबापू यादव, महादेव अनगले, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, महांतेश स्वामी, संजय गोंडाळ, प्रसाद मोरे, संजय गोंडाळ, केदार तोडकर, वैभव मोरे, फहीम पिरजादे, योगेश पवार, , असद फुलारी, समर्थ चव्हाण, सुमित कल्याणी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठलराव रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.




