Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

कैलास हणमंतराव कोलमवार यांची तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड

Admin by Admin
December 10, 2025
in सामाजिक
0
कैलास हणमंतराव कोलमवार यांची तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

जगनाडे महाराज जयंती नायगाव येथे साजरी
तेली समाजाच्या नेतृत्वाची नवी दिशा!
नायगाव / नांदेड (: – सय्यद अजिम नरसीकर )
श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०१ व्या जयंतीनिमित्त नायगाव येथे आयोजित कार्यक्रमात तेली समाज संघटनेच्या तालुका अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया उत्साहात पार पडली. सर्वसमावेशक चर्चा व एकमताने श्री कैलास हणमंतराव कोलमवार यांची तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

बैठकीदरम्यान  राधाकिशन चौधरी यांनी कोलमवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला व मारोतराव परगेवार यांनी अनुमोदन दिले. सर्व उपस्थित समाजबंधूंनी एकमुखाने त्यांना अध्यक्ष म्हणून मान्यता दिल्याची घोषणा करण्यात आली.

जयंती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नायगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मा. विजय पाटील चव्हाण यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष प्रतिनिधी संजय पाटील चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमास पांडुरंग पाटील चव्हाण, नगरसेवक विठ्ठल पाटील बेळगे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विजय पाटील चव्हाण यांनी संताजी महाराज यांच्या कार्याचा आढावा घेत जयंतीबद्दल शुभेच्छा दिल्या. समाजाच्या प्रमुख मागणीचा विचार करून लालवंडी रोडवरील चौकास “श्री संत संताजी महाराज चौक” असे नामकरण करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या निर्णयाचे समाजबांधवांनी स्वागत करून आभार मानले.

कार्यक्रमास विविध गावांतील प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शिवराम अप्पा यरसनवार (माजी सरपंच), श्रीधर कोलमवार, विलासराव व्यक्‍तपुरवार, गंगाराम चांडोळकर, सुनील यरसनवार, गजानन कोलमवार,मा सरपंच लालवंडी ), श्रीधर कोलमवार, राधाकिशन चौधरी, विलासराव व्यकटपुरवार, गंगाराम चांडोळकर, सुनील यरसनवार, गजानन कोलमवार,मारोतराव परगेवार,राजेश्वर यरसनवार, सुरेश व्यकटपुरवार,ग्राम सेवक नागेश यरसनवार, शंकरराव चौधरी, बालाजी चिटकूलवार, बालाजी चौधरी, रामाराव चौधरी, बालाजी येरसनवार, प्रकाश यरसनवार , तेलमवार माधव, नारायण चिकोटकर, मेडाबलमेवार, पुरजवार कहाळेकर,बाबुराव यरसनवार, श्याम अन्सापुरे, इरवंत चौधरी, पुरजवार, मोहन कोलमवार,आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि ऐतिहासिक ठरला असून, नवनिर्वाचित अध्यक्ष श्री कैलास कोलमवार यांच्या नेतृत्वाखाली तेली समाज संघटना नव्या उमेदीने कार्यरत राहणार आहे, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Previous Post

श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्यी ४०१ व्या जयंती नरसी ग्रामपंचायत कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न

Next Post

आदरणीय सुराणा सर आणि बाबा आढाव जातात तेव्हा…

Admin

Admin

Next Post
आदरणीय सुराणा सर आणि बाबा आढाव जातात तेव्हा…

आदरणीय सुराणा सर आणि बाबा आढाव जातात तेव्हा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157522
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697