राजकीय

आपल्या प्रभागाच्या विकासासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयी करा – सुजात आंबेडकर 

 
अक्कलकोट : ( प्रतिनिधी )स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या महत्त्वाच्या असतात .स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निवडून येणारे प्रतिनिधी हे खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करत असतात. यामुळे या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून जनतेने सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.
अक्कलकोट नगर पालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रियांका  मडीखांबे आणि संजाबाई ठोंबरे यांच्या प्रचारार्थ भिमनगर येथे बुधवारी सायंकाळी युवा नेते सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा पार पडली. याप्रसंगी सुजात आंबेडकर बोलत होते. 
या जाहीर सभेस राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य डॉ. नितीन ढेपे, राज्य उपाध्यक्ष व जिल्हा निरीक्षक सोमनाथ साळुंखे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, युवक तालुका अध्यक्ष शिलामणी बनसोडे, तालुका अध्यक्ष विशाल ठोंबरे, कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे रविराज पोटे , आतिश बनसोडे,  सोलापूर शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, महासचिव विनोद इंगळे आदी  मान्यवराचीं प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना युवा नेते सुजाता आंबेडकर म्हणाले , आपण निवडून दिलेले आमदार खासदार हे वर्षातून एकदाही मतदारांना तोंड दाखवीत नाहीत .जितका विकास आमदाराने खासदार करू शकत नाहीत तितका विकास हे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील नगरसेवक म्हणून निवडून गेलेले प्रतिनिधी करत असतात. आपल्या प्रभागातील विविध विकास कामे ही प्रामुख्याने नगरसेवकच करत असतात.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्या विचाराचे उमेदवार हे नगरपालिका महानगरपालिका तसेच पंचायत समिती , जिल्हा परिषद मध्ये असणे गरजेचे आहे. लबाड , चोरी करणाऱ्याना घरी बसवा. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांना बहुमताने विजयी करा.अक्कलकोटच्या प्रगतीसाठी वंचित बहुजन आघाडी हा सक्षम पर्याय आहे असे  शेवटी युवा नेते सुजाता आंबेडकर यांनी सांगितले.या सभेस डॉक्टर नितीन ढेपे , वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे , राज्याचे उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे आदिसह विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या जाहीर सभेला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button