Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीस’ रु. २१ लाखांचा निधीचा धनादेश

Admin by Admin
October 15, 2025
in टॉप न्यूज
0
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीस’ रु. २१ लाखांचा निधीचा धनादेश
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीस’ रु. २१ लाखांचा निधीचा धनादेश श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सोलापूर येथील कार्यक्रमात सुपूर्त करण्यात आला.
दरम्यान सोलापूरचे जिल्हाधिकारी- कुमार आशीर्वाद यांच्या आवाहनानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमध्ये बाधित नागरिकांना जीवनावश्यक धान्य शिधा किट सुमारे रु. ५० लाखाचे ५ हजार नग आणि अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था, हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व सचिवा अर्पिताराजे अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सदर संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना मदत म्हणून १ हजार पूरग्रस्त महिलांना साड्या जिल्हा प्रशासनाला सुपूर्त करण्यात आल्या आहेत.
सोलापूर येथील सोलापूर ते मुंबई विमान सेवेच्या शुभारंभाप्रसंगी सदरचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला. या प्रसंगी केंद्रीय नागरी उड्डाण राज्य मंत्री ना. मुरलीधर मोहोळ, पालक मंत्री ना. जयकुमार गोरे, परिवहन मंत्री ना. प्रतापराव सरनाईक, माजी- खासदार- डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, स्टार एअर लाईन्सचे संजय घोडावत, न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, भाजपा प्रांतिक सदस्य शहाजीराजे पवार, शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर पोलीस आयुक्त राजेश कुमार, सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे, अमर पाटील, अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, शिवराज स्वामी, अतिश पवार, निखील पाटील, रोहन शिर्के, राहुल इंडे, स्वामिनाथ बाबर, सदानंद महाडिक आदिजनासह पदाधिकारी, कार्यकर्ते, हवाई उड्डाण प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 
चौकट-
मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून
अन्नछत्र मंडळाच्या दातृत्वाचे कौतुक –
सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमध्ये बाधित नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. या प्रसंगी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून बाधित नागरिकांना जीवनावश्यक धान्य शिधा किट सुमारे रु. ५० लाखाचे, ५ हजार नग व न्यासाची सहयोगी संस्था, हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पूरग्रस्त महिलांसाठी १ हजार साडी चोळीचे पूरग्रस्ताना वाटप करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे या अगोदरच सुपूर्त करण्यात आले, परत ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीस’ रु. २१ लाखांचा निधीचा धनादेश देण्यात आला आहे. या बाबीचा विशेष उल्लेख करीत  धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्याच्या चढत्या आलेखाबद्दल श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या कार्याची कौतुक मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले.
    
चौकट:-
अन्नछत्र मंडळाकडून अभीष्टचिंतन !
सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री व राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या वतीने या प्रसंगी अभीष्टचिंतन करून, शुभेच्छा देण्यात आल्या.
Previous Post

हन्नूर येथे शिवसेना शिंदे गटाचा मेळावा संपन्न

Next Post

Admin

Admin

Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157236
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697