शैक्षणिक
हिंगोली दौऱ्यादरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी साधला विद्यार्थ्याशीं संवाद

हिंगोली – हिंगोली दौऱ्यादरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या नावाने असलेल्या रामदास आठवले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, माथा (ता. औंढा नाग.) येथे विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला.
शाळेसमोरील मैदानावर पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी खासदार निधीतून ₹ 20 लाख, संगणक उपलब्ध करून देण्याची तसेच CSR निधीतूनही अधिक मदत मिळवून देण्याची घोषणा केली.
यावेळी विद्यार्थ्यांना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाविद्यालयीन जीवनातील व दलीत पँथर चळवळीच्या आठवणी सांगत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षण घ्या, आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून उच्च शिक्षणाच्या बळावर आपले भविष्य घडवा, असे आवाहन केले.



