Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या पालखी परिक्रमेचे तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत आगमन

Admin by Admin
July 17, 2026
in सामाजिक
0
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या पालखी परिक्रमेचे तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत आगमन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसलेयांच्या नेतृत्वाखाली गेल्या २८ वर्षांपासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा काढण्यात येत आहे. यंदाचे २९ वे वर्ष असून, ८ महिने पालखी पादुका महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा राज्यातून परिक्रमा होऊन दि. १५ जुलै रोजी सायंकाळी पावसाच्या रिमजिम सरी झेलत, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय…! श्री अन्नपूर्णा माता की जयच्या जयघोषात तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत आगमन होऊन, अन्नछत्र मंडळात विसावली आहे.
दरम्यान, सोलापूरहून आगमन होताच श्रीक्षेत्र अक्कलकोट मार्गावर असलेल्या विजय बाग पालखी विसावा येथे हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले यांनी पालखीचे दर्शन घेऊन स्वागत केले. तर विजयव्हिला फार्म हाऊस येथे अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या उपस्थितीत,  विश्वस्त अलकाताई जनमेजयराजे भोसले, अर्पिताराजे अमोलराजे भोसले, तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, स्वामिनीराजे अमोलराजे भोसले यांच्यासह हिरकणी संस्थेच्या महिला पदाधिकारी व सदस्यांनी दर्शन घेतले व पालखीचे पूजन करण्यात आले.
श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे खंडोबा मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पालखीचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. याप्रसंगी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, अमोलराजे जनमेजयराजे भोसले, प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते पूजनानंतर बुधवार पेठेतील समाधी मठ येथेही पूजा संपन्न झाली. या प्रसंगी चोळप्पा यांचे वंशज उपस्थित होते. शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूकीने पालखी श्री वटवृक्ष  स्वामी महाराज देवस्थान येथे आगमन झाल्यानंतर आरती संपन्न झाली. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले आणि अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांचा सत्कार संपन्न झाला. यावेळी व्यंकटेश पुजारी व मोहित पुजारी यांच्यासह देवस्थान समितीचे सेवेकरी कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, सदरची पालखी पश्चिम महाराष्ट्र, कोकण, बृहन्मुंबई, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ या विभागात गेल्या २८ वर्षांपासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा काढण्यात येते. या काळात सुमारे २४० दिवसांमध्ये १६ हजार कि.मी.चा प्रवास सुमारे ५१ गावे, महाराष्ट्रातील ३६ जिल्हे व ५५ तालुक्यातून कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे मुक्काम तर गोवा राज्यातील २ जिल्ह्यात पालखीचा मुक्काम असतो.
याबरोबरच बृहन्मुंबई, ठाणे, वसई विरार, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पुणे या महानगरांबरोबरच सांगली, कोल्हापूर, सिधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड, नागा, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, नांदेड, अहिल्यानगर, धाराशिव,  बीड, लातूर या जिल्ह्यातून परिक्रमा होत असून विशेष म्हणजे कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, केरळ राज्याच्या गडचिरोली शहर व परिसरातून मागणी होत आहे.
श्री स्वामींच्या मूळ स्थान श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामींच्या इच्छेनेच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ स्थापन झाले असून, येथे दैनंदिन दोन्ही वेळेस हजारोच्या संख्येने स्वामी भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात.
यासमयी उपाध्यक्ष अमय खोबरे, सचिव शामराव मोरे, खजिनदार लाला राठोड, दिलीप सिद्धे, सत्यजीत जाधव, विश्वस्त व पालखी परिक्रमेचे मुख्य संयोजक संतोष भोसले, मुन्ना राठोर, मा.नगरसेवक विकास मोरे,  सिद्धाराम कल्याणी, मनोज निकम,  अरविंद शिंदे, कांत झिपरे,शीतल फुटाणे, निखिल पाटील, प्रवीण देशमुख, रोहित खोबरे, सौरभ मोरे, गणेश भोसले, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, सोमनाथ कुलकर्णी, विश्वंबर पुजारी, शिवराज स्वामी,  अशपाक काझी, आप्पा हंचाटे, वैभव मोरे, गोविंद शिंदे,  विकास पवार,अतिश पवार,  प्रथमेश पवार, ज्ञानेश्वर भोसले, विकी जाधव, रणवीर झिंगाडे, अॅड.फहीम पिरजादे, सुमित घाडगे, अमित घाडगे, आकाश गडकरी, अमर मसरे, विनायक पाटील, यश विभुते, ओंकार देशमुख, विजय इंगळे, विनायक भोसले, अनंत क्षिरसागर, आकाश शिंदे, ओंकार दुरुगकर, आकाश विभूते, अमोल पाटील, वैभव कामनुरकर, अभिजित सुर्यवंशी, संजय बडवे, किरण साठे, भरत राजेगावकर, प्रवीण घाडगे, गोटू माने, बाळासाहेब घाडगे, शिवकुमार स्वामी, स्वामीनाथ बाबर, शहाजी यादव, सतीश महिंद्रकर , नामा भोसले, शुभम सावंत, संजय गोंडाळ, सागर जाधव, मैनुद्दीन कोरबू, बाळासाहेब कुलकर्णी बबलादकर, महादेव अनगले, योगेश पवार, विशाल घाडगे, दत्ता मोरे, असद फुलारी, राहूल इंडे, सुमित कल्याणी,  महांतेश स्वामी, रमेश हलसंगी, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
Previous Post

चपळगांव गटातील गावांसाठी हन्नुरमध्ये लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांची सहविचार सभा

Next Post

विद्यार्थी चळवळीचा लढवय्या कार्यकर्ता सागर सोनकांबळे ‘पॅंथरत्न’ पुरस्काराने सन्मानित

Admin

Admin

Next Post
विद्यार्थी चळवळीचा लढवय्या कार्यकर्ता सागर सोनकांबळे ‘पॅंथरत्न’ पुरस्काराने सन्मानित

विद्यार्थी चळवळीचा लढवय्या कार्यकर्ता सागर सोनकांबळे ‘पॅंथरत्न’ पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157422
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697