राजकीय
हन्नूर येथे शिवसेना शिंदे गटाचा मेळावा संपन्न

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) : राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा विषय सध्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विचाराधीन असून, या संदर्भात लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली.
अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथे के.बी. प्रतिष्ठानतर्फे आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळावा ,दिवाळी किट वाटप व पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. मंत्री गोगावले म्हणाले,शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. शेतकरी हा आपल्या राज्याचा कणा असून, त्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न सरकार अत्यंत गांभीर्याने घेत आहे. केंद्र व राज्य या दोन्ही पातळ्यांवर या विषयावर सकारात्मक चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लवकरच निर्णय घेतला जाईल. त्याला रक्कम मोठी लागते म्हणून विचारविनिमय सुरू आहे
ते पुढे म्हणाले, अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी शिवसेनेचे सर्व मंत्री विशेष लक्ष देतील. तालुक्यातील शेतरस्ते, सिंचन प्रकल्प आणि इतर कृषीविषयक कामांना प्राधान्य दिले जाईल. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी रायगडचा मावळा असून, सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
या कार्यक्रमात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गरजूंना २५१ दिवाळी किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास मोहोळचे आमदार राजु खरे, संपर्कप्रमुख महेश साठे, महिला संपर्कप्रमुख अनिताताई माळगे, जिल्हा प्रमुख अमर पाटील, चरण चवरे, प्रथमेश म्हेत्रे, रमेश बारस्कर, संयोजक विश्वनाथ भरमशेट्टी,बाबासाहेब पाटील, महिला जिल्हाप्रमुख रविना राठोड, वर्षा चव्हाण, वैशाली हावनुर, क्रांतिताई दर्गोपाटील, सिद्धार्थ गायकवाड, रईस टिनवाला, सुनिल कटारे, स्वामिनाथ हेगडे, राजकुमार भरमशेट्टी, वैभव भरमशेट्टी, सिद्धाराम भंडरकवठे, शाकिर पटेल, मनोज भरमशेट्टी, विनीत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री सिद्धाराम
म्हेत्रे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य
संस्थांच्या निवडणुकांमध्ये अक्कलकोट तालुक्यातील सर्व संस्थांवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकविण्याचे आवाहन केले. तसेच तालुक्यातील सर्व गावांसाठी भरघोस निधी मिळावा, अशी मागणी त्यांनी मंत्री गोगावले यांच्याकडे केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी तालुका प्रमुख सोपान निकते यांनी केले, सूत्रसंचालन काजल जगदाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजकुमार भरमशेट्टी यांनी मानले. अक्कलकोट शहर, तालुका तसेच हन्नूर परिसरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.