Sunday, September 6, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

राज्य शासन या आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी – पालकमंत्री गोरे

संपादक - स्वामीराव गायकवाड by संपादक - स्वामीराव गायकवाड
September 19, 2025
in सोलापूर
0
राज्य शासन या आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी – पालकमंत्री गोरे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी करून प्रशासनाने पंचनामे त्वरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.राज्य शासन या आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी आहे अशी ग्वाही  पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील  नुकसानग्रस्त गावांना भेटी व नुकसानीची पाहणी करण्यात आली.
सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात अनुक्रमे २ व सर्वच १० महसुली मंडळात अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे तसेच गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.  पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी  दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तुर, तोगराळी व कुंभारी तसेच अक्कलकोट तालुक्यातील सांगवी, शिरशी, बोरगाव, बादोले, रामपूर, साफळे, व किणी या गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष नुकसानीचे पाहणी केली. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत व त्याबाबतचा अहवाल शासनाला त्वरित सादर करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.
      यावेळी शेतकरी, नागरिक यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला व अशा आपत्तीच्या काळात राज्य शासन पूर्णपणे आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. तसेच शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
     प्रारंभी  पालकमंत्री  जयकुमार गोरे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तुर येथील पाण्याने वाहून गेलेल्या रस्त्याची पाहणी केली. तसेच जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने माहिती देऊन दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात झालेल्या शेती पिकांचे रस्त्यांचे व अन्य बाबींच्या नुकसानीची माहिती पालकमंत्री महोदय यांना दिली.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट तालुक्यातील सर्वच मंडळातील अतिवृष्टी बाधित शेती, घरे यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे. शेतकऱ्यानां पंचनामे झाल्या नंतर आर्थिक मिळेल असे सांगितले.    यावेळी आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, प्रांताधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार किरण जमदाडे, तहसीलदार विनायक मगर यांच्यासह सर्व संबंधित गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
Previous Post

सी. बी. खेडगी महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून सुवर्ण पदक

Next Post

सोलापूरात शनिवार व रविवारी संगीत प्रतिभा महोत्सव

संपादक - स्वामीराव गायकवाड

संपादक - स्वामीराव गायकवाड

Next Post
सोलापूरात शनिवार व रविवारी संगीत प्रतिभा महोत्सव

सोलापूरात शनिवार व रविवारी संगीत प्रतिभा महोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

158349
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697