Sunday, September 6, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सोलापूरात शनिवार व रविवारी संगीत प्रतिभा महोत्सव

संपादक - स्वामीराव गायकवाड by संपादक - स्वामीराव गायकवाड
September 19, 2025
in सोलापूर
0
सोलापूरात शनिवार व रविवारी संगीत प्रतिभा महोत्सव
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : ( प्रतिनिधी ) दुर्लभ सुंद्रीवाद्या कला अकादेमी सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार, महाराष्ट्र राज्य सांस्कृतीक कार्य संचनालय, संगीत नाटक अकादेमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 20 व 21 सप्टेंबर 2025 रोजी संगीत प्रतिभा महोत्सव आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पंडित भिमण्णा जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शनिवार दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी सायं- 6:00 वाजता लोकमान्य टिळक सभागृह एंपी थिएटर हिराचंद नेमचंद वाचनालlय किल्ला बागे समोर महाराष्ट्र राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयाचे संचालक बिभिषण चवरे, प्रा.सिद्धेश्वर अप्पासाहेब खुबा,
डॉ. विजयकुमार शिरवाळ डॉ. किरण जोशी, पंडित गुरुनाथ जाधव, गोरखनाथ जाधव यांच्या हस्ते संगीत प्रतिभा महोत्सवाचे उद्घाटन होईल यावेळी महोत्सवाची सुरूवात पाचव्या पिढीचे बाल कलाकार मास्टर व्यंकटेशकुमार जाधव, कु.कलाश्री जाधव यांच युगलं सुन्द्री वादन होईल यांना श्रेयश कंगळे तबल्यावर साथ करतील. एक भारतीय बहुमुखी गायिका डॉ. वृषाली देशमुख याचं शास्त्रीय गायन होईल त्यांना संवादिनी साथ – शशिकांत देशमुख तर तबला – नितीन दिवाकर सहकलावंत म्हणून साथ करतील. तसेच यावेळी मध्यप्रदेशचे भोपाळ येथील निनाद अधिकारी याचं संतूर वादन होईल सहकलावंत म्हणून धारवाडचे मल्लेश होगार देसाई कल्लूर हे तबला साथ करतील. जगविख्यात कलाकार दिल्लीच्या राऊंद्री सिहं याचं ओडिसा नृत्य सादर होईल.
रविवार दि. 21 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी – 9:00 वाजता. सोलापूर जिल्हा वृद्ध कलावंत नियोजन समितीतील सदस्यांचा सत्कार सोहळा होईल तदनंतर अंतरराष्ट्रीय कलावंत पंडित रुद्रेश बंजत्री याचं सनई वादन होईल त्यांना पंडित मनमोहन कुंभार तबला साथ करतील.ग्वाल्हेर घराण्याच्या जेष्ठ गायिका पं. शुभदाताई पराडकर यांची शिष्या अदिती कोरटकर याचं शास्त्रीय गायन होईल त्यांना पंडित मनमोहन कुंभार तबला साथ तर राजकुमार सावळगी हे संवादिनी साथ करतील. आंतराष्ट्रीय किर्तीचे हार्मोनियम वादक ज्ञानेश्वर सोनवणे व शुभदा गायकवाड यांचे संवादिनी युगलं वादन होईल. त्यांना धारवाडचे मल्लेश होगार देसाई कल्लूर हे तबला साथ करतील. मुबंई येथील अंतरराष्ट्रीय कलावंत दिशा देसाई याचं कथक नृत्याने कार्यक्रमाचे समारोप होईल. साकव फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉ. जगदीश पाटील या संपूर्ण संगीत महोत्सवाचे सुत्र संचालन करतील. हे दोन्ही दिवसाचे कार्यक्रम लोकमान्य टिळक सभागृह एम्पी थिएटर हिराचंद नेमचंद वाचनालंय किल्ला बागे समोर सोलापूर येथे होत आहे शनिवार दिनांक २० संप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता व रविवार दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता हा संगीत महोत्सव आयोजित केला आहे.हा महोत्सव सर्वांसाठी खुला व विनाशुल्क आहे तरी रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन दुर्लभ सुंद्रीवाद्या कला अकादेमी अध्यक्ष पंडित भिमण्णा जाधव यांनी केले आहेत.या महोत्सव पार पडण्याकरिता गायत्री जाधव, निलेश कुलकर्णी,मनोजकुमार कगळे संतोष कोथळीकर, पंडीत गुरुनाथ जाधव, गोरखनाथ जाधव, यश कलशेट्टी, वीर चव्हाण, प्रेम चव्हाण, सिद्राम जाधव, मास्टर व्येकटेशकुमार जाधव, कलाश्री जाधव, श्रुती मैंदर्गीकर, अनुग्रह हलकुडे हे परिश्रम घेत आहेत.

Previous Post

राज्य शासन या आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी – पालकमंत्री गोरे

Next Post

गणेशोत्सवातील सामाजिक उपक्रमासाठी पत्रकार सिध्दार्थ भडकुंबे यांचा सन्मान

संपादक - स्वामीराव गायकवाड

संपादक - स्वामीराव गायकवाड

Next Post
गणेशोत्सवातील सामाजिक उपक्रमासाठी पत्रकार सिध्दार्थ भडकुंबे यांचा सन्मान

गणेशोत्सवातील सामाजिक उपक्रमासाठी पत्रकार सिध्दार्थ भडकुंबे यांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

158375
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697