देश - विदेश

दोन रुपयात उपचार करणारे डॉक्टर’ ए के गोपाल यांचे निधन

 

केरळ – केरळमधील कन्नूर येथे डॉ. ए के रायरू गोपाल यांचे शनिवारी (2 ऑगस्ट) निधन झाले. “दोन रुपयांचे डॉक्टर” या नावाने प्रसिद्ध असलेले तसेच अत्यंत सन्मानित वैद्यक डॉ. ए.के. गोपाल ८० वर्षांचे होते. त्यांना वृद्धापकाळाचे आजार होते. ते आज निघून गेले मात्र मागे ठेवली ती करुणा आणि निःस्वार्थ सेवेची विरासत, त्यांच्या निस्वार्थ समाजसेवेने असंख्य लोकांना प्रभावित केले आहे. अनेक वर्षे ते केवळ २ रुपये शुल्क घेऊन गरीब लोकांचा इलाज करत असत. हे शुल्क इतके नाममात्र होते की त्यांना “दोन रुपयांचे डॉक्टर” हे टोपणनाव मिळाले होते.

डॉ. गोपाल यांनी आरोग्यसेवेला समर्पित केलेल्या आयुष्यासाठी विनम्र श्रद्धांजली. त्यांची करुणामय सेवा भारतातील वैद्यकीय नैतिकतेचा आदर्श राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button