अक्कलकोट येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या युवा यल्गार सभेचे आयोजन

अक्कलकोट (प्रतिनिधी )अक्कलकोट येथे वंचित बहुजन आघाडीची युवा नेते सुजाता आंबेडकर यांच्या युवा एल्गार सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांनी दिले. सदरची युवा यल्गार सभा ही सोमवार दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता श्री मल्लिकार्जुन मंदिरा शेजारी बस स्थानक समोर होणार आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी माता भगिनींवर अत्याचार होत असून त्याची दखल घेतली जात नाही. राज्यातील तरुण हा बेरोजगार झाला आहे. शेतकरीवर्ग हा हवालदिन झाला आहे .भारताचे संविधान पायदळी तुडविण्याचे काम सुरू आहे. राज्यातील अनेक विषयांवर या यल्गार सभेत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजाता आंबेडकर हे बोलणार असून या यलगार सभेत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर क्रांती सावंत , राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य डॉक्टर नितीन ढेपे , राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंखे आदींसह राज्यातील व जिल्ह्यातील विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या युवा यल्गार सभेस अक्कलकोट शहर व तालुक्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील शिव शाहू फुले आंबेडकरवादी जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांनी केले आहे. या युवा यल्गार सभेच्या यशस्वीतेसाठी वंचित बहुजन युवक आघाडी अक्कलकोट तालुका अध्यक्ष शिलामणी बनसोडे , सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते रविराज पोटे , भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष साहिल कांबळे ,अमृत सोनकांबळे ,संतोष बाळशंकर ,संदीप बाळशंकर , विजय भालेराव , यशवंत इंगळे , संजय इंगळे ,कृष्णा इंगळे , गोविंद इंगळे , गौतम सीताफळे , शंकर इंगळे , सोपान इंगळे , राजकुमार इंगळे , राजकुमार वाघमारे आदी परिश्रम घेत आहेत.