सामाजिक

परंडा येथे दिव्यांग तपासणी शिबिर संपन्न-दिव्यांग उद्योग समुहाचा पुढाकार

 

परंडा / धाराशिव ( फारूक शेख )परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीची सोय व्हावी. दिव्यांग व्यक्तींना जाण्यासाठी त्रास होऊ नये व धाराशिव येथे हेलपाटा होऊ नये याकरिता दिव्यांग उद्योग समूहाचे राज्य अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षापासून परंडा येथे दिव्यांग तपासणी कॅम्प महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी होतात. त्यानिमित्त दि.६ फेब्रुवारी २०२६ रोजी दिव्यांग तपासणी शिबिर यशस्वीपणे पार पडले. या शिबिरामध्ये अस्थिव्यंग दिव्यांग २८ मतिमंद दिव्यांग ८ आंध दिव्यांग ६ अशा एकूण ४२ दिव्यांग व्यक्तींची तज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करण्यात आली. या तपासणी शिबिरासाठी धाराशिव येथून अस्थिव्यंग तपासणी डॉ कृष्णा स्वामी मतिमंद तज्ञ डॉ सुहास शिंदे अंध विभाग तज्ञ डॉ पवन महाजन यांनी कामकाज पाहिले हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तानाजी घोडके परंडा तालुका अध्यक्ष तानाजी सांगडे दिव्यांग नागरिक सरकारी दवाखान्यातील कर्मचारी डॉक्टर कार्यालयीन मुख्य अबरार पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा कॅम्प यशस्वीपणे पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button