Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे  महिलांचे सामुदायिक श्रीगणेश अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम संपन्न 

Admin by Admin
September 4, 2025
in सामाजिक
0
हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे  महिलांचे सामुदायिक श्रीगणेश अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम संपन्न 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट :(प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात सालाबादप्रमाणे बुधवारी सायंकाळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ व न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचे सामुदायिक श्रीगणेश अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम मंडळ परिसरातील श्री शमी विघ्नेश् गणेश मंदिरा समोर शेकडो महिलांच्या मुखातून उमटलेल्या अथर्वशीर्ष पठणाच्या या सामूहिक स्वरांनी मंगलमय वातावरणात चैतन्य व उत्साह निर्माण झाला होता.
गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी सायंकाळच्या मंगल समयी प्रसन्नतेची अनुभूती दिली. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा चौथ्या वर्षीही महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला.  पारंपरिक पेहरावातील महिलां सायंकाळी अथर्वशीर्ष पठणासा उत्सव मंडपासमोर गर्दी केली होती. महिलांनी ॐकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठन करीत गणरायाला नमन केले. 
दरम्यान या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन समाधी मठाचे पुजारी व चोळप्पा महाराजांचे पाचवे वंशज धनंजय महाराज पुजारी, तृप्ती पुजारी, कु.ऋषी पुजारी, संस्थापिका अध्यक्षा अलकाताई जनमेजयराजे भोसले, सचिवा अर्पिताराजे अमोलराजे भोसले, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, सचिव शामराव मोरे,  माजी नगराध्यक्षा अनिताताई खोबरे, यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी समाधी मठाचे पुजारी धनंजय महाराजपुजारी यांनी मनोगत व्यक्त केले.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापिका अध्यक्षा अलकाताई जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली महिलांचे सामुदायिक श्रीगणेश अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम भक्तिमय व उत्साही वातावरणात संपन्न झाला. दरम्यान श्री गणेश उत्सवानिमित्त आयोजित श्री गणेश अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचा प्रारंभ ‘श्रीं’च्या नित्यपूजनाने झाला. श्रींचे पूजन समाधी मठाचे पुजारी धनंजय महाराज पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले. 
अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रमात परिसरातील मुली, महिला आदींसह बहुसंख्य भाविक सहभागी झाले होते. अथर्वशीर्ष पठणानंतर समाधी मठाचे पुजारी धनंजय महाराज पुजारी व जमलेल्या भाविकांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. कार्यक्रमाचे न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी यांनी केले. मंत्रोपच्चारात सोहळा पार पडताना भक्तिमय वातावरण बनले होते. नावे नोंदविलेल्या महिलांना अथर्वशीर्ष पोथी मंडळाकडून देण्यात आली. कार्यक्रमास आलेल्या सर्व महिलांना प्रसाद देण्यात आला.
यावेळी स्मिता कदम, स्वाती निकम, उज्वला भोसले, संगिता भोसले, पल्लवी नवले, सुवर्णा घाटगे, स्वप्ना माने, कविता वाकडे,  क्रांती वाकडे, सिमा फुटाणे, अनिता भंडारे, राजश्री माने, छाया पवार, रुपाली पवार, श्रुती मोरे, कविता भोसले, तृप्ती बाबर, निशा बाबर, वैशाली क्षिरसागर, वैशाली लोकापुरे, शकुंतला कटारे, सुखदा ग्रामोपाध्ये, संस्कृती ग्रामोपाध्ये, श्रद्धा मोरे, संगीता राठोड, आशा भगरे,मानसी जाधव,  विजू लोणी, वैशाली यादव, वैष्णवी पवार, साक्षी पवार यांच्यासह आदिजन उपस्थित होते. 
कार्यक्रमास न्यासाचे विश्वस्त राजेंद्र लिंबीतोटे, अप्पा हंचाटे, बाबुशा महिंद्रकर, सौरभ मोरे, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर,प्रवीण घाटगे, पुरोहित संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी, रोहित खोबरे, रोहन शिर्के वैभव मोरे, अॅड.फहीम पीरझादे, मुख्य सुरक्षा रक्षक महादेव अनगले, अनिल गवळी, ज्ञानेश्वर भोसले, आप्पा हंचाटे, सौरभ मोरे, मल्लिकार्जुन बिराजदार दत्ता माने, राजू पवार, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, मुन्ना कोल्हे, बसू क्यार, महांतेश स्वामी, धानप्पा उमदी, नामा भोसले, सुमित कल्याणी, संभाजीराव पवार, बाळासाहेब घाडगे,सुमित कल्याणी, विशाल घाडगे, धनंजय निंबाळकर, राजेंद्र काटकर, विनय भोसले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
Previous Post

महाराष्ट्रात मतचोरीचा पहिला प्रयोग कामठीत; मतचोर सरकारला सत्तेतून खाली खेचूनच गप्प बसू:  हर्षवर्धन सपकाळ

Next Post

काँग्रेस किसान संघटनेचे  समन्वयक घाळे यांनी घेतली नागोरे येथील कुंभार कुटूंबीयाची भेट

Admin

Admin

Next Post
काँग्रेस किसान संघटनेचे  समन्वयक घाळे यांनी घेतली नागोरे येथील कुंभार कुटूंबीयाची भेट

काँग्रेस किसान संघटनेचे  समन्वयक घाळे यांनी घेतली नागोरे येथील कुंभार कुटूंबीयाची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157522
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697