राजकीय

काँग्रेस किसान संघटनेचे  समन्वयक घाळे यांनी घेतली नागोरे येथील कुंभार कुटूंबीयाची भेट

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
 अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किसान संघटनेचे  समन्वयक तसेच महाराष्ट्र  काँग्रेसचे प्रभारी  प्रकाश  घाळे हे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर आले असता अक्कलकोट तालुक्यातील मौजे नागोरे येथील सुनील कुंभार यांनी कर्जबाजारी, उसाचे थकीत बिल, खाजगी फायनान्स तसेच अतिवृष्टी ला कंटाळून ११ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. त्या अनुषंगाने त्याच्या घरी भेट देवून कुंभार कुटूंबीयाचें सांत्वन केले. या प्रसंगी 
जेऊर चे उपसरपंच . काका पाटील तसेच अक्कलकोट तालुका काँग्रेस उपाध्यक्ष . हर्षदीप गायकवाड , भटक्या विमुक्त जाती सेल चे अध्यक्ष . विलास राठोड व ग्रामस्थ उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button