Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

राज्यात पावसाचा जोर वाढणार: हवामान विभागाचा इशारा

Admin by Admin
August 28, 2025
in महाराष्ट्र
0
राज्यात पावसाचा जोर वाढणार: हवामान विभागाचा इशारा

Oplus_16777216

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पुणे – गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) यासंदर्भात मोठा इशारा जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या काळात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
राज्यातील मराठवाडा, कोकण आणि विदर्भ या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सिंधुदुर्ग, जालना, परभणी, नांदेड, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रासोबतच छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, गोवा आणि ओडिशासारख्या सात राज्यांमध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकमध्येही पावसाचे प्रमाण वाढणार असून उद्या आणि परवासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 98 टक्के भरले असून जिल्ह्यातली 12 धरणे 100 टक्के भरली आहेत. 
 त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सुरू झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, रब्बी पिकांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच, नागरिकांना उकाड्यापासूनही दिलासा मिळाला आहे.
Previous Post

फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात 500 वृक्षांची लागवड

Next Post

प्रत्येकाने जिद्द ठेवली तर यश हमखास मिळते : – न्यायाधीश घुगे

Admin

Admin

Next Post
प्रत्येकाने जिद्द ठेवली तर यश हमखास मिळते : – न्यायाधीश घुगे

प्रत्येकाने जिद्द ठेवली तर यश हमखास मिळते : - न्यायाधीश घुगे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157272
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697