Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

प्रत्येकाने जिद्द ठेवली तर यश हमखास मिळते : – न्यायाधीश घुगे

Admin by Admin
August 28, 2025
in सोलापूर
0
प्रत्येकाने जिद्द ठेवली तर यश हमखास मिळते : – न्यायाधीश घुगे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

करमाळा : – (आयुब शेख ) : – “प्रत्येकाने जिद्द ठेवली तर यश हमखास मिळते. मोठे होण्यासाठी मोठी स्वप्ने पाहणे आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन करमाळा येथील वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश व तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष संजयकुमार घुगे यांनी केले. मांगी येथील प्रगती विद्यालयात तालुका विधी सेवा समिती व करमाळा वकील संघ यांच्या वतीने आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

न्यायाधीश घुगे पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी करिअर घडविताना अन्याय सहन करू नये. कुठलाही अन्याय झाल्यास प्रथम पालकांना, त्यानंतर शिक्षकांना कळवावे. तसेच १८ वर्षांखालील मुलांना न्यायालयामार्फत मोफत वकील मिळतात. राज्यघटनेत दिलेल्या अधिकारांचा योग्य वापर करून जिद्दीच्या जोरावर प्रगती साधावी.”

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर . ए. के. शर्मा, करमाळा वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. अलीम पठाण, वरिष्ठ सदस्य ॲड. डॉ. बाबुराव हिरडे, ॲड. राहुल सावंत, ॲड. बलवंत राऊत, ॲड. प्रशांत बागल, अॅड. अक्षय वीर, अॅड. विश्वजीत बागल, अॅड. बालाजी इंगळे, शाळेच्या मुख्याध्यापिका . अनुपमा देवकर, गावचे उपसरपंच  नवनाथ बागल, पोलीस पाटील . आकाश शिंदे ,. राहुल बागल, श्री. शुभम बागल, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी न्यायाधीश श्री. शर्मा यांनी प्रेरणादायी विचार मांडले.
ॲड. अक्षय वीर यांनी पॉस्को कायदा,
ॲड. प्रशांत बागल यांनी वाहतूक कायदा,
ॲड. राहुल सावंत यांनी नागरिकांची मूलभूत कर्तव्ये या विषयावर तर
ॲड. डॉ. बी. टी. हिरडे यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. शिबिराचे प्रास्ताविक अॅड. विश्वजीत बागल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक आर. पी. खराडे तर संयोजन कनिष्ठ लिपिक . पी. डी. करपे व श्री. मेटकरी यांनी केले. तर आभार प्रदर्शन अॅड. विक्रम चौरे यांनी मानले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुपमा देवकर यांनी सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने येथेच्छ स्वागत केले. या कार्यक्रमाला प्रगती विद्यालय मांगीचे मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.

Previous Post

राज्यात पावसाचा जोर वाढणार: हवामान विभागाचा इशारा

Next Post

देशात सर्वसमावेशक राजकीय नेतृत्वाची वानवा; ॲड. प्रकाश आंबेडकर

Admin

Admin

Next Post
देशात सर्वसमावेशक राजकीय नेतृत्वाची वानवा; ॲड. प्रकाश आंबेडकर

देशात सर्वसमावेशक राजकीय नेतृत्वाची वानवा; ॲड. प्रकाश आंबेडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157273
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697