Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून अचानक पेट्रोल पंपाची तपासणी 

Admin by Admin
May 26, 2026
in सोलापूर
0
जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून अचानक पेट्रोल पंपाची तपासणी 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर ( प्रतिनिधी ):- सोलापूर जिल्ह्याला पेट्रोल, डिझेल व गॅस पुरवठा करणाऱ्या बीपीसीएल, एचपीसीएल व आयओसीएल या सर्व कंपन्यांनी सोलापूर जिल्ह्याला प्राधान्य देऊन मोठ्या प्रमाणात बफर स्टॉक उपलब्ध ठेवावा. तसेच दैनंदिन मागणीप्रमाणे जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात इंधनपुरवठा सुरळीतपणे ठेवणे आवश्यक असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात (दि. 25)पेट्रोल, डिझेल व गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधी समवेत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी कार्तीकेयन मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, गॅस कंपनीचे जिल्हा समन्वयक श्री. रघुकुमार, बीपीसीएलचे वरिष्ठ अधिकारी प्रवीण यादव, संजयकुमार, एचपीसीएलचे सागर चव्हाण, निकीत रेड्डी व आयओसीएलचे सागर गौतम, तन्मय आनंद, आयएमसील कंपनीचे नंदकिशोर अडसुळे, अनिल करीर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्तीकेयन पुढे म्हणाले की, काही पेट्रोल विक्रेत्याकडून कंपनीने दररोज काही मर्यादेतच पेट्रोल, डिझेल विक्री करावी असे बंधने घातल्या बाबतच्या तक्रारी आलेल्या आहेत. तरी सर्व संबंधित कंपन्यांनी जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय पेट्रोल विक्रेत्यावर इंधन विक्रीचे कोणत्याही प्रकारची बंधने घालू नयेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. यापुढे अशा कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येऊ नये, तसेच इंधनपुरवठा सोलापूर शहरासह ग्रामीण भागात ही सुरळीतपणे सुरू राहील याबाबत दक्षता घ्यावी, असे त्यांनी सुचित केले.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी पेट्रोल डिझेल पुरवठ्याच्या अनुषंगाने काळजी करू नये जिल्ह्यात मुबलक प्रमाणात इंधन साठा उपलब्ध असून कंपन्यांना दररोज नियमित मागणीप्रमाणे पेट्रोल डिझेल उपलब्ध केले जात आहे. विशेषत: जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी पेट्रोल, डिझेलचा अतिरिक्त साठा करून ठेवू नये, असेही आवाहन जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी केले आहे. तसेच CNG गॅस पुरवठ्यात ही कंपनीने मागणीप्रमाणे वाढ करावी.

प्रारंभी जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्याकडून सर्व पेट्रोल डिझेल व गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या कंपन्यांची रोजची पेट्रोल व डिझेलची मागणी व त्याप्रमाणे कशा पद्धतीने पुरवठा होत आहे याविषयी माहिती घेण्यात आली. तसेच गॅस पुरवठा कशा पद्धतीने केला जात आहे व त्यात मोठ्या प्रमाणात वाढ करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच कंपन्यांकडून किमान सात दिवसाचा पेट्रोल व डिझेलचा बफर स्टॉक ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले तसेच सोलापूर शहर व ग्रामीण भागात मागणीप्रमाणे पेट्रोल व डिझेल पुरवठा रोजचा रोज उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले.

जिल्ह्यातील सर्व डीलर व विक्रेते यांच्या पेट्रोल व डिझेल च्या अनुषंगाने अडीअडचणी जाऊन घेतल्या. व ग्राहकांना इंधन पुरवठा सुरळीत करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. सरडे यांनी काही पेट्रोल पंप चालकाकडून ड्रम व मोठ्या प्रमाणात एकाच व्यक्तीला इंधन पुरवठा होत आहे, अशा तक्रारी ग्रामीण भागातून येत आहेत. तसेच अक्कलकोट करमाळा बार्शी या तालुक्यात इंधनपुरवठा विस्कळीत झाल्याबाबत ही तक्रारी येत असल्याने या भागातील पेट्रोल पंप सुरू राहतील या दृष्टीने कंपन्यांनी त्या ठिकाणच्या विक्रेत्यांना पुरवठा करावा अशा सूचना त्यांनी दिल्या.

आज जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांच्याकडून पंढरपूर येथील एका पेट्रोल पंपाची तपासणी

सर्व तहसीलदार यांनी कोणत्याही पेट्रोल पंपावर इंधनाची कृत्रिम टंचाई होणार नाही याची दक्षता घ्यावी

जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलच्या अनाधिकृत साठवणुकीसह काळाबाजार रोखण्यासाठी तसेच काही नागरिकाकडून पेट्रोल विक्रेत्याकडून पेट्रोल डिझेलचे शॉर्ट सेलिंग सुरू असल्याची तक्रारी आलेल्या होता, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी आज पंढरपूर शहरातील एका पेट्रोल पंपावर तपासणी केली. या ठिकाणी सर्व बाबी व्यवस्थित असल्याचे आढळून आले.

*सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी तालुक्यातील कोणत्याही पेट्रोल पंपावर कृत्रिम टंचाई होणार नाही या दृष्टीने लक्ष ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पेट्रोल पंपाची तपासणी करावी. व ग्राहकांना सुरळीत इंधन पुरवठा होईल यासाठी दक्ष राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी दिले.

तालुकानिहाय संयुक्त भरारी पथक स्थापन-पेट्रोल पंपांवर डिझेल खरेदीसाठी रांगा लागल्याने काळाबाजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन तालुका निहाय संयुक्त भरारी पथक स्थापन करण्यात आले आहेत.
संयुक्त पथकात तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी समन्वयक म्हणून, पोलिस निरीक्षक कायदा व सुव्यवस्था प्रमुख म्हणून, तर निरीक्षक अधिकारी/नायब तहसीलदार तांत्रिक तपासणी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय मंडळ अधिकारी, पुरवठा निरीक्षक/सहा. महसूल अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे.

वजन, मापे उपायुक्तांनी जिल्ह्यातील पेट्रोल पंपाचे क्लाबिरेशन(अचूकता तपासणी) व्यवस्थितपणे करावे.
वजन व मापे कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपाचे क्लाबिरेशन योग्य पद्धतीने केलेले आहे की नाही याची तपासणी करावी. ज्या पेट्रोल पंचाचे क्लबिरेशन योग्य नाही ते दुरुस्त करून योग्य प्रमाणात करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी उपायुक्त वजन व मापे यांना आज दिले.

 

Previous Post

कोल्हापूर ते अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रा सेवाभावी संस्थेच्या वतीने महेश इंगळे यांचा मानपत्र देऊन झाला सन्मान

Next Post

डोंगर आणि झाडाशिवाय जमीनीत पुरेसे पाणी साठवणे अशक्य 

Admin

Admin

Next Post
डोंगर आणि झाडाशिवाय जमीनीत पुरेसे पाणी साठवणे अशक्य 

डोंगर आणि झाडाशिवाय जमीनीत पुरेसे पाणी साठवणे अशक्य 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697