महाराष्ट्र
डिजिटल मीडियाचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना वाढदिवसानिमित्ताने सत्कार

मिरज / सांगली ( प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई.,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तथा ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे डिजिटल मीडियाचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या.. यावेळी त्यांना संत तुकाराम महाराज पगडी, पुष्पगुच्छ, स्वामी विवेकानंदांची मूर्ती, छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले.. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ विश्वास आरोटे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश प्रसिद्ध प्रमुख नवनाथ जाधव, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रचार प्रमुख संजय फुलसुंदर यांनी सिद्धार्थ भोकरे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा दिल्या. 



