सामाजिक
अक्कलकोट येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे हद्दीत आगामी काळात होणारे श्री गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद २०२५ अनुषंगाने दिनांक २५ ऑगस्ट रोजी प्रियदर्शनी मंगल कार्यालय, अक्कलकोट येथे शांतता कमिटी, श्री गणेश मंडळ पदाधिकारी,पोलीस पाटील व डीजे डॉल्बी धारक यांची शांतता मीटिंग घेण्यात आली.
सदर मीटिंगमध्ये गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी,तसेच कोणतेही जातीय,धार्मिक तणाव निर्माण होऊ नये, नो डीजे नो डॉल्बी संकल्पना राबविण्यात यावी, पारंपरिक वाद्याचा वापर करावा, पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
सदर मीटिंग करिता आमदार सचिन कल्याणशेट्टी, अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक,सोलापूर ग्रामीण, . विलास यामावर,उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट,.विनायक मगर,तहसीलदार अक्कलकोट, राजू आडम, उप अभियंता एम एस ई बी, शैलेश जाधव,कार्यालयीन अधीक्षक नगरपालिका, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार,पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे, सपोनि अनिल सणगले, सपोनि निलेश बागाव, अमोलराजे भोसले, दिलीप सिद्धे,अविनाश मडीखांबे,चंद्रशेखर मडीखांबे,सुनील खवळे, नन्नू कोरबू, बाबा पाटील,संजय देशमुख,मल्लिनाथ पाटील,मल्लिनाथ महादेव पाटील,इरफान दावांना,मिलन कल्याणशेट्टी,महेश हिंडोळे,रत्नाकर गायकवाड, सद्दाम शेरीकर वगैरे शांतता कमिटी सदस्य, गणेश मंडळ पदाधिकारी,पोलीस पाटील व डॉल्बीधारक हजर होते.
तसेच सदर कार्यक्रम दरम्यान आषाढी वारी पंढरपूर येथे बंदोबस्त असणारे पोलिसांना जेवणाकरिता अन्नदान करणारे अमोलराजे भोसले यांचा मा.पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यातर्फे प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात आले.
सदरचा कार्यक्रम झाल्यानंतर डॉल्बी न लावण्याबाबत शपथ देण्यात आली.
सदर कार्यक्रमादरम्यान दिलीप सिद्धे,राहुल रुई,बालाजी माशाळे, शुकूर शेख,. विलास यामावर,श्री राजेंद्र टाकणे, अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक,सोलापूर ग्रामीण व .आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहेत.




