सामाजिक
श्री वटवृक्ष देवस्थान समितीचे धार्मिक कार्य, सेवा, उपक्रम उल्लेखनीय -माजी मंत्री चंद्रकांत खैरे

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेले येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे स्वामींचे वास्तव्य असलेले जागृत स्थान आहे. स्वामी समर्थांच्या भक्तीतून अनेक भाविकांना विविध माध्यमातून स्वामींच्या आशीर्वादाची प्रचिती येत आहे. स्वामींचे हे आशीर्वाद स्वामी दर्शनाच्या माध्यमातून भाविकांना तात्काळ पुरविण्याचे काम श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे प्रमुख महेश इंगळे हे अत्यंत सेवाभावी वृत्तीने सांभाळत आहेत. स्वामींच्या या वटवृक्ष मंदिरात वेळोवेळी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येत असतात. हे माझ्या स्मरणात आहे.
मंदीरातील धार्मिक कार्यक्रम सर्वधर्म समभावाचे प्रसार व अध्यात्म कार्याचे प्रसारक कार्य असल्याचे सांगून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे धार्मिक कार्यसेवा व उपक्रम उल्लेखनीय असल्याचे मनोगत
शिवसेना उध्दव ठाकरे गट नेते तथा
माजी मंत्री चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले. आज माजी मंत्री चंद्रकांत खैरे यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी माजी मंत्री चंद्रकांत खैरे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र व प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी माजी मंत्री चंद्रकांत खैरे बोलत होते. पुढे बोलताना चंद्रकांत खैरे
यांनी इंगळे हे प्रत्यक्ष मंदीरातील वटवृक्षाखाली तासंतास उभे राहून प्रत्येक भक्तांना सुलभ स्वामींचे दर्शन कसे मिळेल याचे अत्यंत तळमळीने नियोजन करित असतात. महेश इंगळे यांच्या या व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीची ही सेवाही उल्लेखनीय बाब असल्याचे मनोगत व्यक्त करून सर्व स्वामी भक्तांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रथमेश इंगळे, शिवसेना उध्दव ठाकरे गट उपनेत्या अस्मिता गायकवाड, जिल्हा प्रमुख संतोष पाटील, प्रा.अजय दासरी, केगनाळकर ,महिला आघाडी जिल्हा प्रमुख बसवंती, तालुका प्रमुख आऩद बुककानवरे, शहर प्रमुख राम जाधव, रवि डोके, श्रीमती ढेपे , श्रीमती होटकर
मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, गिरीश पवार, श्रीकांत मलवे, विपुल जाधव, महेश मस्कले आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.




