सामाजिक

जन्मभूमी फाउंडेशनतर्फे दुधनी शहरासाठी  ‘स्वर्ग रथ’ (शव वाहिनी) सेवा सुरू

 म. नि. प्र. डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजींच्या हस्ते लोकार्पण .
​ अक्कलकोट ( प्रतिनिधी )
“जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. दुःखाच्या काळात कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधिलकी ठरतेअसे प्रतिपादन  श्री म. नि. प्र. डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांनी केले. दुधनी व परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी जन्मभूमी फाउंडेशनच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या नूतन ‘स्वर्ग रथ’ (शव वाहिनी) लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
​दुधनी शहर आणि लगतच्या ग्रामीण भागात अंत्यविधीच्या वेळी किंवा पार्थिव ने-आण करण्यासाठी योग्य वाहनाची वेळेवर उपलब्धता होणे अत्यंत गरजेचे असते. ही बाब लक्षात घेऊन जन्मभूमी फाउंडेशनने पुढाकार घेत सर्व आधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज अशा ‘स्वर्ग रथ’ शव वाहिनीची व्यवस्था केली आहे. या सेवेचा लोकार्पण सोहळा डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या शुभहस्ते व आशीर्वादाने पार पडला.
​सेवेची ठळक वैशिष्ट्ये
​२४ तास तत्पर सेवा दुधनी शहर व परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही सेवा अखंडितपणे उपलब्ध राहील.
​आधुनिक सोयी-सुविधा: अंत्ययात्रेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयींनी युक्त सुसज्ज वाहन.
​तातडीने उपलब्धता: गरजेच्या वेळी नागरिकांना वेळेत सहकार्य मिळावे यासाठी नियोजनबद्ध यंत्रणा.
​या लोकार्पण प्रसंगी जन्मभूमी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि दुधनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आवश्यकतेनुसार नागरिकांनी या सेवेसाठी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button