सामाजिक
अक्कलकोटच्या उभारणीत अभियंत्याचे मोठे योगदान – जनमेजयराजे भोसले

अक्कलकोट (- प्रतिनिधी )
अक्कलकोटच्या उभारणीत अभियंत्याचे मोठे योगदान आहे , सिंहाचा वाटा आहे . असे गौरवोद्गार श्रीस्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी काढले .
लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट अध्यक्ष अभय खोबरे यांच्या वतीने मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती निमित्त्य अभियंता दिन निमित्य आदर्श अभियंत्याचा श्रीस्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा तर्फे फेटा स्वामीची मुर्ती छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन आदर्श अभियंता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला . याप्रसंगी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले बोलत होते . व्यासपीठावर अन्नछत्र मंडळाचे सचिव शाम मोरे , अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त चंद्रकांत कापसे , लायन्स अध्यक्ष अभय खोबरे , नगर परिषदेचे आरोग्य सभापती अविनाथ मडीखांबे , लायन्स सचिव शिरिष पंडीत , प्रभाकर मजगे , चेतन जाधव , लायन राजेंद्र हत्ते , खजिनदार विठ्ठल तेली , मल्लीकार्जुन मसुती , मल्लीनाथ साखरे , मठपती आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी अभियंता सुर्यकांत राऊत , पि जाधव ,
श्रानिवास बासुदकर ,प्रशांत धनशेट्टी ‘ ‘श्रीनिवास पाडळ ‘राजेश खांडेकर ‘ विकास केरूर ‘ ‘ सतीश थळंगे ‘ प्रथमेश आळोळी , नितीन ग्राम , अमोल भालके , राजकुमार कुंभार , नितीन बावकर ,सविता कटारे ,अंकिता धोंगडे , राजेश शेळके , बाबुराव चौगुले , माजी नगराध्यक्ष अनिता खोबरे यांचा सत्कार करण्यात आला . मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक
व स्वागत शिरिष पंडीत यांनी केले .
अध्यक्ष ला . अभय खोबरे यांच्या हस्ते अतिथीचा सत्कार करण्यात आला . याप्रसंगी आभार शिरिष पंडीत यांनी मानले. या कार्यक्रमास शिवराज स्वामी , अशोक कडगंची, तोरणी पाटील ,सुभाष गडसिंग , दत्ता कटारे , प्रशांत शिंदे , धोंगडे , गणेश आळोळ्ळी अशपाक काझी , गुरु पोतदार , शदीद वळसंगकर , शिंदे यासह लायन्स शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , पदाधिकारी उपस्थित होते.



