Tuesday, September 8, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच शासकीय कार्यक्रमांमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावणे बंधनकारक करावे

संपादक - स्वामीराव गायकवाड by संपादक - स्वामीराव गायकवाड
September 8, 2026
in सामाजिक
0
शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच शासकीय कार्यक्रमांमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावणे बंधनकारक करावे
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर ( प्रतिनिधी ): महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये तसेच शासकीय कार्यक्रमांमध्ये लावणे बंधनकारक करण्यात यावे, यासाठी शासन आदेश व राजपत्र काढण्यात यावे, अशी मागणी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ, सोलापूर जिल्हा व शहर यांच्या वतीने करण्यात आली.
या मागणीसंदर्भात संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीत ऐतिहासिक व मोलाचे योगदान दिले असून, सामाजिक समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या महान कार्याचा आणि संविधान निर्मितीतील योगदानाचा सन्मान म्हणून शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच शासकीय कार्यक्रमांमध्ये त्यांची प्रतिमा सन्मानपूर्वक लावणे आवश्यक आहे, अशी भूमिका निवेदनाद्वारे मांडण्यात आली.
शासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने शासन आदेश काढावा व आवश्यक ते राजपत्र प्रसिद्ध करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच शासकीय कार्यक्रमांमध्ये लावणे बंधनकारक करावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे सोलापूर जिल्हा व शहर पदाधिकारी, कार्यकर्ते व आंबेडकरी चळवळीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post

अक्कलकोट शहर व तालुका संचलित श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साह साजरी 

Next Post

जन्मभूमी फाउंडेशनतर्फे दुधनी शहरासाठी  ‘स्वर्ग रथ’ (शव वाहिनी) सेवा सुरू

संपादक - स्वामीराव गायकवाड

संपादक - स्वामीराव गायकवाड

Next Post
जन्मभूमी फाउंडेशनतर्फे दुधनी शहरासाठी  ‘स्वर्ग रथ’ (शव वाहिनी) सेवा सुरू

जन्मभूमी फाउंडेशनतर्फे दुधनी शहरासाठी  'स्वर्ग रथ' (शव वाहिनी) सेवा सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

158498
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697