राजकीय

अक्कलकोट येथे शिवसेना ठाकरे पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न 

 अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुका व जिल्हास्तरावर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा मंगळवारी सर्जेराव जाधव सभागृहात सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याचे आयोजन शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख शरणराज केंगनाळकर यांनी केले होते. शरणराज केंगनाळकर यांच्या हस्ते शिवसेना ठाकरे पक्षाच्या अक्कलकोट तालुका प्रमुख पदी रवी डोके , तालुका संघटक पदी वसंत देडे , तालुका समन्वय बाबुराव राठोड , अक्कलकोट शहर प्रमुख राम जाधव , शहर संघटक महंमद पठाण , शहर समन्वयक गंगाराम धोत्रे , सोशल मीडिया प्रमुख मल्लिनाथ खुबा , जिल्हा संघटक सोपान निकते , जिल्हा समन्वयक आयाज जमादार , विधानसभा प्रमुख श्रीशैल स्वामी , विधानसभा संघटक बाबु  राम राठोड ,विधानसभा समन्वयक संतोष पाटील ,उपजिल्हाप्रमुख मनोज पवार ( अक्कलकोट ) ,विश्वजीत चौगुले ( बोरामणी विभाग ) , उपजिल्हा संघटक गुरुनाथ पाटील , उपजिल्हा समन्वयक मृगेंद्र मुंदनकेरी ,  महंमद पठाण शहर आदी पदाधिकाऱ्यांचा फेटा बांधून बुके देऊन सत्कार करण्यात आला .याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शरणराज केंगनाळकर यांनी अक्कलकोट तालुक्यासह विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत शिवसेना  पोचली पाहिजे. आता शेतकरी हा दुष्काळाने तर सर्वसामान्य माणूस महागाईने होरपळला गेला आहे. दुष्काळ आणि महागाईच्या प्रश्नावर शिवसैनिकांनी आंदोलन करून शिवसेनेची ताकद ही शासनाला दाखवून दिली पाहिजे असे आवाहन शरणराज केगनाळकर यांनी केले. याप्रसंगी तालुका संघटक वसंत देडे , शहर प्रमुख राम जाधव , जिल्हा संघटक सोपान निकते ,जिल्हा समन्वयक आयाज जमादार , उपजिल्हाप्रमुख मनोज पवार , विधानसभा प्रमुख श्रीशैल स्वामी आदींनी मनोगत व्यक्त केले. या सत्कार सोहळ्यात शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button