सामाजिक

किसान एकता संघ भारत दिल्ली संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी शेतकरी  नेते चंद्रकांत रेवणसिद्ध पाटील  यांची निवड

अक्कलकोट ( प्रतिनिधी )

किसान एकता संघ भारत दिल्ली संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी येथील  नेते चंद्रकांत रेवणसिद्ध पाटील  यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष सोरन प्रधान दिल्ली यांनी सदरची निवड एकमताने केली आहे.. यावेळी महाराष्ट्र संरक्षक  सुनिता  येरणे ,  प्रदेश प्रभारी व महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष सुधीर इंगळे , तात्यासाहेब मते महाराष्ट्र प्रदेश राज्य कार्य अध्यक्ष , .मालती मुळे महाराष्ट्र राज्य प्रदेश महिला अध्यक्ष ,कल्याणी मुळे युवती महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष ,पुरुषोत्तम गायकी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष , तुकाराम गायकवाड पाटील सोलापूर जिल्हा अध्यक्ष आदी चीं प्रमुख उपस्थिती होती.  चंद्रकांत पाटील यांनी संघटनेचे अक्कलकोट तालुका प्रमुख म्हणून पद भुषविले आहे. तसेच तालुका युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील यांनी   काम केले आहे.  कर्नाटक राज्य मध्ये विजय कर्नाटक रक्षणा वेदके रैत राज्य अध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील यांनी काम केले आहे.  अनेक पद भुषविलेल्या चंद्रकांत पाटील यांना  महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये  दोन्ही राज्य मध्ये चांगले कार्य करण्याची संधी मिळाली. किसान एकता संघ च्या  राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची निवड करून त्यांना देश पातळीवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्यां प्रश्नावर आवाज उठविणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्या निवडी बद्दल  महाराष्ट्र व कर्नाटक येथील शेतकऱ्यांनी आनंद  व्यक्त केली आहे.  चंद्रकांत रे पाटील यांच्या निवडी बद्दल बोरोटी गावात स्वागत करण्यात आले.. माजीमंत्री  सिद्धाराम म्हेत्रे यांचे  कट्टर समर्थक म्हणून चंद्रकांत पाटील ओळखले जातात.   सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील  शेतकऱ्यांच्यां विविध प्रश्नावर आवाज उठवून  शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटीबद्ध आहे. शेतकऱ्यच्यां हक्कासठी  सरकाराला धारेवर धरणार असल्या ची माहिती  किसान एकता संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष  चंद्रकांत रे पाटील यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button