जि प. प्राथमिक शाळा टोकवाडी येथील माजी विद्यार्थी उत्कर्ष सुरेश राठोड याची आय आय टी खरगपूर पश्चिम बंगाल येथे झाली निवड.

परतूर / जालना ( राम राठोड )जि प. प्राथमिक शाळा टोकवाडी येथील माजी विद्यार्थी उत्कर्ष सुरेश राठोड याची आय आय टी खरगपूर पश्चिम बंगाल येथे झाली निवड झाली आहे.
उत्कर्ष सुरेश राठोड याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी येथे झाले.माध्यमिक शिक्षण.. त्याने सेलू या ठिकाणी पूर्ण केले. तदनंतर स्क्रीनिंग टेस्ट देऊन राजश्री शाहू कॉलेज लातूर या कॉलेजमध्ये त्याचे निवड झाली.. लातूर या ठिकाणी दोन वर्ष अथक परिश्रम घेऊन उत्कर्ष ने राष्ट्रीय पातळीवरची भारतातली सर्वात अवघड परीक्षा मध्ये उत्कृष्ट यश मिळवले. त्या निकष्यावर उत्कर्ष ची निवड आयआयटी खरगपूर पश्चिम बंगाल झाली…
उत्कर्ष चे वडील सुरेश किशनराव राठोड हे टोकवाडी येथे राहत असून ते माध्यमिक शिक्षक पाथरी येथे कार्यरत आहेत. काका एन.के. राठोड सर प्राथमिक शिक्षक जि.प. प्रा. शाळा लिंबेवडगाव येथे कार्यरत आहेत..
उत्कर्ष बालपणा पासूनच अभ्यासाची आवड,अत्यंत बुद्धीवान, स्पर्धा परीक्षेची तयारी करणे त्याला आवडत असे…
उत्कर्ष हा टोकवाडी गावाचा लाडका मुलगा म्हणून त्याची ओळख… तो अगदी शांत संयमी सर्वाशी आदराने बोलणारा.. मुलगा…
आज त्याच्या यशाने टोकवाडी गावकरी,शिक्षक वृंद,मित्र परिवार, नातेवाईकाकडून त्याच अभिनंदन होत आहे..




