महाराष्ट्र

अखेर करार ! मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांचा ऐतिहासिक विजय 

मुंबई –  मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्यां कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील लढ्याला मोठे यश आले असून ८ हजार कंत्राटी कामगार कायम होणार आहेत. तसेच लाड-पागे समितीच्या शिफारसी लागू होणार आहेत.
 सफाई कामगारांना सरकारी योजनेतून मालकी हक्काची घरे मिळणार आहेत.
१ ऑगस्ट रोजी भव्य विजयी मेळावा घेण्यात येणार आहे.कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा, एकही पद न कमी करण्याचा आणि इतर मागण्यांबाबत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
 मनपा आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत म्युनिसिपल कामगार ॲक्शन कमिटी आणि मनपा कामगार संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची निर्णायक बैठक पार पडली आणि करार झाला.
या बैठकीला समाजवादी कामगार नेते साथी कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरेश ठाकूर, विजय कुलकर्णी, अशोक जाधव, रमाकांत बने, वामन कविस्कर, मिलिंद रानडे, रंगा सातवसे, बाबा कदम, देवी गुजर, प्रकाश जाधव, शेषराव राठोड, प्रफुल्लता दळवी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
१ ऑगस्ट रोजी विजयी मेळावा होणार, असे यावेळी संयुक्तपणे जाहीर करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button