सामाजिक

अक्कलकोट येथील भीम नगरमध्ये शौचालयाची दुरावस्था, वंचित बहुजन आघाडीकडून तिव्र आंदोलनाचा इशारा

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट येथील भीम नगरमध्ये महिला व पुरुष शौचालयाची मोठी दुरावस्था झाली असून ड्रेनेज पाईपच्या नावाखाली भीम नगर खड्डेमय झाले आहे . सर्वत्र  चिखल  झालेला असून याचा नाहक त्रास नागरिकांनां होत आहे. नगर परिषदेने भीमनगर मध्ये महिला व पुरुषांसाठी  नविन  शौचालय बांधावे. तसेच भीमनगर मधील रस्त्याचें सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात यावे अशी मागणी
वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली असून  तिव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
भीमनगर मध्ये ड्रेनेज पाईप साठी सर्वत्र खड्डे खोदून दोन महिने उलटले तरीही तिथले  काँक्रिटीकरण रस्त्याचे काम अजून झालेले नाही. याठिकाणी खड्डे आणि चिखल अत्यंत मोठ्या प्रमाणात झालेला आहे. 
यामुळे अबालवृद्धानां त्रास होत आहे. भीम नगरच्या पाठीमागच्या बाजूला मोठी पाण्याची टाकी झालेली आहे. त्याच्याच बाजूला सार्वजनिक शौचालय आहे. पुरुषांसाठी आणि महिलांसाठी भीम नगर मध्ये इतक्या मोठ्या वस्तीमध्ये दोन शौचालय आहे. एक मैंदर्गी रोडला दुसऱ्या पाण्याच्या टाकीच्या बाजूला शौचालय आहे. या दोन्ही शौचालयाला दरवाजे नाहीत. ,स्वच्छता नाही, परशा फुटलेले आहेत. सगळीकडे झाडे झुडपे वाढलेले आहेत.अत्यंत घाणेरडी अवस्था या शौचालयाची झालेली असून या शौचालय ची दुरुस्ती स्वच्छता तसेच रस्त्याचे काँक्रिटीकरण व भीमनगर मधील समाज मंदिराची दुरुस्ती  जर आठ दिवसात झाले नाही तर  वंचित बहुजन आघाडी कडून तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. याबाबत चे निवेदन अक्कलकोट नगर परिषद प्रशासनास देण्यात आले.
वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट शहर व तालुक्याच्या वतीने बेमुदत अर्धनग्न आंदोलन  आणि सोबत आपल्याला जागृत करण्यासाठी हलगी नाद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे युवक तालुका अध्यक्ष शिलामणी बनसोडे, शहराध्यक्ष विशाल ठोंबरे, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश शिंदे, किरण किरण अंबादास बनसोडे, ज्ञानेश्वर दसाडे सुनील शिंगे, शहर उपाध्यक्ष संतोष घाडगे, सिद्धार्थ बनसोडे, सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ता रवी पोटे, माणिक गायकवाड, संदीप गजदाने, सचिन गजदाणे, मल्लिनाथ पाटील शौकत मुजावर, तालुका महासचिव नागेश हरवाळकर हनुमंत गोसावी सह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button