महाराष्ट्र

वेळुवन बुद्ध विहार रुपीनगर तळवडे पुणे येथे साप्ताहिक प्रवचन मालिकेचे उदघाटन

पिंपरी चिंचवड ( अशोक शिवशरण )दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा पिंपरी-चिंचवड जिल्हा अंतर्गत वार्डशाखा रुपीनगर तळवडे पुणे, वंचित बहुजन आघाडी वार्डशाखा रुपीनगर, तळवडे पुणे आणि वेळुवन बुद्धविहार संवर्धन ट्रस्ट ( रजि.नं.एफ. 45100/पुणे-13/5/2015, महा.-1295/पुणे-21/7/2014 ) यांचे संयुक्त विद्यमाने वेळुवन बुद्ध विहार रुपीनगर तळवडे पुणे येथे साप्ताहिक प्रवचन मालिकेचे उदघाटन करण्यात आले.
सदरचे उदघाटन भारतीय बौद्ध महासभा पिंपरी-चिंचवड जिल्हा अध्यक्ष . राधाकांत कांबळे यांचे हस्ते करण्यात आले.यानंतर
त्यांनी भगवान बुद्धांचे पहीले प्रवचन (विशुद्धि मार्ग) या विषयावर
खूप छान पद्धतीने प्रवचन दिले,
या वेळी पिंपरी-चिंचवड जिल्ह्याचे कोषाध्यक्ष  बौद्धाचार्य रामचंद्र आचलकर , वंचित बहुजन कामगार आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष काॅम्रेड राहुल इनकर , राजरत्न बुद्ध विहार सेक्टर 22 चे संस्थापक. शिवशरण हिपरीकर,राजरत्न बुद्ध विहाराचे संघटक .सन्मुख हादिमनी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या सर्व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय बौद्ध महासभा ” फ ” विभाग* *अध्यक्ष बौद्धाचार्य प्रशांत नाटेकर  आणि फ विभाग संघटक बाबासाहेब वाघमारे हे उपस्थित होते.यावेळी वंचित बहुजन आघाडी पिंपरी-चिंचवड शहर अंतर्गत निगडी विभाग संघटक शिरिष भालेराव, प्रसिद्धी प्रमुख आयु.साहेबराव गायकवाड हे उपस्थित होते.
या सर्वांचे स्वागत वेळुवन बुद्ध विहाराचे संस्थापक आणि वंचित बहुजन आघाडी पिंपरी-चिंचवड शहराचे मा. प्रवक्ता आयु.के.डी.वाघमारे, वेळुवन बुद्ध विहाराचे आधारस्तंभ युवा नेते  प्रणव ओव्हाळ आणि वेळुवन बुद्ध विहाराचे नियोजित अध्यक्ष  सुनिल वाघमारे यांनी केले.
या सर्वांचा सत्कार पंचशील उपरणे, वंचित बहुजन आघाडीचे उपरणे आणि एक एक गुलाब फुल देऊन करण्यात आला. हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम वेळुवन बुद्ध विहाराचे जेष्ठ सभासद आयु.पंडित खरात, उत्तमराव सरतापे, मारुती गायकवाड, कमलाकर हिरवे, अनिल उबाळे, सुनिल घाडगे, दिपक वाघमारे,विजय जंजाळ, सतिष कांबळे, सूरज पटेकर, अमोल सावंत, सिद्धार्थ वाघमारे, अभिजय उबाळे, विवेक उबाळे, हार्दिक गायकवाड, सुनिल जाधव, अनंत सावंत, प्रतिक सावंत, स्वप्निल दिलीप वाघमारे यांचे शुभ हस्ते करण्यात आला.
या वेळी खास आपल्या वेळातील वेळ काढून  सर्वांना मार्गदर्शन करन्यासाठी के.डी.वाघमारे यांचे थोरले बंधू निवृत्त प्राचार्य शहाजी वाघमारे  हे उपस्थित राहिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  के.डी.वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शनाचे काम वेळुवन बुद्ध विहाराचे आधारस्तंभ युवा नेते  प्रणव ओव्हाळ यांनी केले.
शेवटी वंचित बहुजन महिला आघाडी रुपीनगर तळवडे वार्डशाखा अध्यक्षा सौ. सोनम दिपक वाघमारे आणि उपाध्यक्षा सौ.ज्योती सुनिल वाघमारे यांचे हस्ते सर्वांना खिरदान करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button