सोलापूर: ( रमेश सुरवसे ) सोलापूर जिल्हा परिषदेमधील सर्व शिक्षा अभियान विभागाचे मुख्य लेखाधिकारी म्हणून प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत उत्तम प्रशासक असलेले वैभव राऊत ” यांना शासनाने सोलापूर जिल्हा कोषागार अधिकारी या महत्वाच्या पदावर पदोन्नती दिल्याने ते सोलापूर जिल्हा कोषागार कार्यालयात रुजू झाल्यानंतर ” तसेच सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा श्रीमती मनीषा मिसकर, जात पडताळणीचे उपायुक्त रविंद्र कदम ( पाटील ) आणि संशोधन अधिकारी म्हणुन संतोष जाधव यांचाही राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा सोलापूर यांच्या वतीने त्यांच्या त्यांच्या कार्यालयात जाऊन सत्कार करण्यात आला. आज जिल्हा कोषागार कार्यालय, कर्मचारी संघटनेचे सोलापूर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भिमराव लोखंडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा कोषागार कर्मचारी संघटनेचे युवा सरचिटणीस व रासकम.संघटनेचे युवा सहसचिव श्रीकांत होसमनी व त्यांचे पदाधिकारी गणेश कांबळे, छबूताई काळे, दयानंद पवार यांच्या हस्ते वैभव राऊत यांच्या मुख्य दालनात शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुछ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. त्यानंतर सात रस्ता, सोलापूर येथील जिल्हा जात पडताळणी समितीच्या कार्यालयातील जात पडताळणी समितीच्या अध्यक्ष तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती मनीषा मिसकर यांच्यासह जात पडताळणी समितीचे उपायुक्त रवींद्र कदम (पाटील) तसेच जात पडताळणी समितीचे सदस्य सचिव संतोष जाधव यांचाही बाळकृष्ण पुतळे आणि राजाभाऊ सोनकांबळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सोलापूर,” जिल्हा शाखेचे पदाधिकारी तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व खातेनिहाय संघटनांचे पदाधिकारी व सभासद यांच्यावतीने जिल्हा कोषागार अधिकारी वैभव राऊत, जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा श्रीमती मनीषा मिसकर, उपायुक्त रविंद्र कदम (पाटील) आणि संशोधन अधिकारी संतोष जाधव यांचा सत्कार करत त्यांचे विशेष अभिनंदन केले व पुढील प्रशासकीय यशस्वी कारकिर्दीस संघटनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.. सोलापूर आयटीआय.निदेशक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ज्येष्ठ नेते बाळकृष्ण पुतळे, उच्च शिक्षण सोलापूर विभागाचे विभागीय अध्यक्ष राजाभाऊ सोनकांबळे , जिल्हा मलेरिया विभागाचे माजी अध्यक्ष डॅशिंग ज्येष्ठ नेते सी.एस.स्वामी, सोलापूर जिल्हा वाहन चालक कर्मचारी संघटनेचे, तसेच लिपिक संघटनेचे अध्यक्ष व जिल्हा कोषाध्यक्ष हुसेनबाशा मुजावर, सोलापूर जिल्हा कृषि अधिकारी/कर्मचारी संघटनेचे नेते आर.जे.शिंदे, सोलापूर जिल्हा भुजल व सर्व्हेक्षण कर्मचारी संघटनेचे युवा अध्यक्ष व जिल्हा सहसचिव शशिकांत भालेराव, जिल्हा कोषागार कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष भिमराव लोखंडे, आयटीआय ( चतुर्थश्रेणी ) कर्मचारी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस ज्येष्ठ नेते उपाध्यक्ष सटवाजी होटकर, जिल्हा कोषागार कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्रीकांत होसमनी व त्यांचे सहकारी पदाधिकारी गणेश कांबळे, दयानंद पवार, छबूताई काळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर माने, सार्वजनिक पाटबंधारे विभाग ( चतुर्थश्रेणी ) कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व संघटन प्रमुख आशुतोष नाटकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी संघटनेचे युवा अध्यक्ष व संघटक सुनिल बोलबत्तीन सार्वजनिक आरोग्य विभाग कर्मचारी संघटनेचे अन्य पदाधिकारी व सभासद ,सिंचन भवन ( चतुर्थश्रेणी ) कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व मार्गदर्शक ज्येष्ठ नेते चंद्रकांत चलवादी,सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय ( चतुर्थश्रेणी ) कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ अनुभवी नेते रघुनाथ बनसोडे, यांच्यासह राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना शहर, जिल्हा शाखेचे पदाधिकारी, सदस्य तसेच रासकम.संघटनेमधील सर्व खातेनिहाय संघटनांचे प्रमुख पदाधिकारी व सभासद हे सदरच्या सत्कार समारंभ कार्यक्रमांस मोठया संख्येने उपस्थित होते.