सामाजिक

भारतीय बौद्ध महासभा ब क्षेत्रिय विभाग तालुका कार्यकारिणीची निवड जाहीर

पिंपरी चिंचवड ( अशोक शिवशरण )दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) पिंपरी चिंचवड जिल्हा पुणे. अध्यक्ष .राधाकांत कांबळे .सेक्रेटरी .डी.व्ही.सुरवसे  व कोषाध्यक्ष रामचंद्र आचलकर यांनी  ‘ ब’ क्षेत्रीय विभाग ( तालुका) कार्यकारिणीची नियुक्ती घोषित केली. सदरचा कार्यक्रम रविवार दिनांक ६ जुलै रोजी. शाक्यमुनि मल्टिपर्पज चारिटेबल ट्रस्ट संचालित रत्नसंभव बुद्ध विहार ,सूर्य पुत्र भय्यासाहेब आंबेडकर चौक, वाल्हेकर वाडी,चिंचवड,पुणे येथे घेण्यात आला..
   या प्रसंगी जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
संस्कार उपाध्यक्ष भीमराव ढोबळे , कार्यालयीन सचिव अशोक यादव , संस्कार सचिव दत्ता गायकवाड , संरक्षण सचिव गौतम रिकीबे , संघटक दत्ता कांबळे , समता सैनिक दलाचे मेजर सुरेश भालेराव  पर्यटन प्रचार सचिव ईश्वर लिंबाजी ठाणांबीर यांच्या उपस्थितीत ‘ब’ क्षेत्रीय विभाग (तालुका) कार्यकारिणी निवडण्यात आली.
अध्यक्ष; सुनील सोपान दिवे .
सरचिटणीस: राजेंद्र एकनाथ धनवडे .
कोषाध्यक्ष : चंद्रकांत किसन जगताप 
संस्कार वि.उपाध्यक्ष: प्रकाश दादाहरी पोळके .
पर्यटन प्रचार उपाध्यक्ष: भरत गौतम वाघमारे .
संरक्षण उपाध्यक्ष: मुरलीधर लक्ष्मण सोनवणे .
संस्कार सचिव : निवृत्ती चंद्रकांत जाधव 
पर्यटन प्रचार सचिव : राहुल आण्णा शिरोळे 
संरक्षण सचिव : सचिन लक्ष्मण पवार.
कार्यालयीन सचिव : प्रा.सारंग संपत वाघमारे.
हिशोब तपासणीस : कृष्णा लक्ष्मण घंटेश्वर 
संघटक  : विकास अशोक जगताप.
सुरज सुनील साळुंखे, महेंद्र प्रभाकर सैंदाणे, गुलाब विश्वनाथ कांबळे 
नुतन कार्यकारणीस अध्यक्ष राधाकांत कांबळे  यांनी मार्गदर्शन केले.सरचिटणीस डी. व्ही सुरवसे यांनी पदाची जबाबदारी समजावून सांगितली. कोषाध्यक्ष रामचंद्र आचलकर  यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
संस्कार उपाध्यक्ष भीमराव ढोबळे  यांनी श्रामणेर शीबीर घेणे आवश्यक आहे व आपण सर्वांनी त्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले. सर्व जिल्हा पदाधिकारी यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button