महाराष्ट्र
पुणे येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून त्याचे शुद्धीकरण

पुणे -रविवार दि. ६ जुलै रोजी सूरज शुक्ला या माथेफिरूने पुणे रेल्वे स्थानकाबाहेर असणाऱ्या महात्मा गांधींजींच्या पुतळ्यावर धारदार कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करून पुतळ्याची विटंबना केली. अतिशय संतापजनक अशी ही घटना असून तिचा निषेध व्हायलाच हवा होता. म्हणूनच या विटंबनेच्या निषेधार्थ आज पुतळ्याजवळ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून त्याचे शुद्धीकरण करण्यात आले.
या आंदोलनामध्ये पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, अभय छाजड, मा. नगरसेवक अविनाश बागवे, अँड.राजश्री अडसूळ, व काँग्रेस पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांनीही सहभागी होत आपला निषेध दर्शवला.



